शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्या निवारण अभियान राबविणार

By admin | Updated: September 22, 2015 00:10 IST

राजू शेट्टी : महिन्याभरात केंद्र व राज्य शासनाला अहवाल देणार

सांगली : राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत करण्याबरोबरच आत्महत्या रोखण्यासाठी आत्महत्या निवारण अभियान आम्ही राबविणार आहोत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले की, राज्यात गेल्या काही वर्षात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शासनामार्फत या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येत आहे, मात्र आत्महत्या होऊच नयेत, यासाठी प्रयत्नांची गरज आहे. कर्जामुळे खचलेल्या व चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना त्या परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येऊ शकतात, याचा विचार सुरू आहे. राज्यातील विशेषत: विदर्भातील दहा गावांचा सर्व्हे यासाठी करणार आहोत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे कुटुंब तसेच कर्जामुळे अडचणीत आलेले अन्य शेतकरी यांच्याशी चर्चा केली जाईल. सविस्तर अभ्यास करून याविषयीचा एक अहवाल आम्ही तयार करणार आहोत. केवळ परिस्थितीचा अहवालच नव्हे, तर त्यामध्ये आम्ही काही उपायसुद्धा सुचविणार आहोत. शेतकऱ्याला आत्महत्याच करावी लागू नये, अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. दहा वर्षाच्या कालावधीसाठी शेतकऱ्याला कर्ज मिळावे. त्या कर्जावरील व्याज शासन व सामुदायिक सामाजिक दायित्व योजनेतून (सीएसआर) भागविण्यात यावे. तसेच कर्जाचे संकटकाळात पुनर्गठन झाले पाहिजे. शेतकऱ्याच्या सात-बारावर मालकीसदरी कोणत्याही बॅँकेचे अगर सोसायटीचे नाव लागता कामा नये. इतर हक्कात वित्तीय संस्थेचे नाव असावे. अशा प्रकारच्या अनेक उपाययोजनांमधून राज्यात शेतकऱ्यांसाठी चांगले वातावरण तयार करता येऊ शकते. येत्या महिन्याभरात याचा अहवाल केंद्र व राज्य शासनाला सादर करणार आहोत, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)‘नाम’ला पाठिंबा नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू केलेल्या फाऊंडेशनचा उपक्रम चांगला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा त्यास पाठिंबा आहे. आत्महत्या होऊच नयेत म्हणून आम्ही जी मोहीम हाती घेणार आहोत, त्यासाठी त्यांनीही प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.सावकार व नातलगांचेच कर्ज अधिकआत्महत्या केलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी सावकार व नातवाईकांकडून कर्ज घेतले होते. सावकारी तगादा असह्य होत असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यामुळे बॅँकांकडून शेतकऱ्यांना सहजरित्या कर्जपुरवठा उपलब्ध झाला पाहिजे, असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले. पदांसाठी वाट पाहूघटकपक्षांनी सत्तेतील सहभागासाठी यापूर्वी बैठक घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर कोणतीही बैठक झाली नाही. मात्र आम्ही सरकारला यासाठी वेळ देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे पदांसाठी आताच कोणताही आमचा आग्रह नाही. योग्यवेळी याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे शेट्टी म्हणाले.