शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान वापरावे

By admin | Updated: December 14, 2014 23:55 IST

तुकाराम मोरे : वारणनगर येथे विविध पुरस्कारांचे वितरण

वारणानगर : शेतकऱ्यांनी शेती व्यवसायासाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केल्यास शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी मोठी मदत होईल, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांनी केले. येथील श्री तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना आणि शेतीपूरक व शेती प्रशिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित कृषी पुरस्कार समारंभात ते बोलत होते.यावेळी माजी मंत्री विनय कोरे व कुलगुरू डॉ. मोरे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांनी शेतकऱ्यांना गौरविण्यात आले. बेलवडे हवेली (ता. कऱ्हाड, जि. सातारा) येथील शेतकरी बापूराव रघुनाथ पवार यांना ‘स्व. विलासमामा कोरे कृषी तंत्रज्ञ २०१४’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. वारणा परिसरातील प्रगतशील शेतकरी बाजीराव बच्चे (बच्चे सावर्डे, ता. पन्हाळा), बाबासो संकपाळ (पोखले, ता. पन्हाळा), गुंडू दणाणे (किणी, ता. हातकणंगले), हौसेराव पाटील-चव्हाण (येल्लूर, ता. वाळवा) व सर्जेराव पाटील (करंजवडे, ता. वाळवा) यांना ‘सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.रंजना देशमुख (कोडोली, ता. पन्हाळा), भाग्यश्री जाधव (बहिरेवाडी, ता. पन्हाळा), बाळाबाई पाटील (भादोले, ता. हातकणंगले), विद्या गावडे (शिगाव, ता. वाळवा), लीलाबाई भोसले (चिकुर्डे, ता. वाळवा) या पाच प्रगतशील महिलांना ‘स्व. सावित्रीआक्का कोरे कृषिलक्ष्मी’ पुरस्काराने गौरविण्यात आले.विनय कोरे म्हणाले, ‘वारणा’च्या माध्यमांतून शेतकरी सभासदांसाठी सातत्याने नवनवीन योजना आणत आहे. यापुढेही शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळून ऊसपिकासह अन्य पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. आर. वाय. खोत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रतापराव पाटील, व्ही. एस. कोले, बी. जी. सुतार, हिंदुराव तेली, प्रकाश मोरे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.वारणानगर येथे आयोजित केलेल्या ‘वारणा कृषी प्रदर्शनात’ विविध पुरस्कारांनी शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले. माजी मंत्री विनय कोरे व महात्मा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांच्या हस्ते कृषिभूषण पुरस्कार स्वीकारताना बाजीराव बच्चे.