शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळ तालुक्यात शेतकरी खरिपाच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:22 IST

गतवर्षी कोरोना महामारीमुळे मोठे संकट ओढवले. शासनाने टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन केले. छोटे, मोठे सर्व उद्योगधंदे ठप्प झाले होते. मात्र, अशा ...

गतवर्षी कोरोना महामारीमुळे मोठे संकट ओढवले. शासनाने टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन केले. छोटे, मोठे सर्व उद्योगधंदे ठप्प झाले होते. मात्र, अशा काळात शेतकरी वर्ग आपली कामे सुरळीतपणे करीत होता. कृष्णा, पंचगंगा, वारणा व दुधगंगा या नद्यांमुळे शिरोळ तालुका सुजलाम्‌- सुफलाम्‌ बनला आहे. नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्यांकडून शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जातात. गतवर्षी कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला नाही. परिणामी, नुकसानीलादेखील सामोरे जावे लागले.

कोरोनानंतर पावसामुळेदेखील शेतीला मोठा फटका बसला. सप्टेंबर २०२० मध्येदेखील पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले होते. परतीचा पाऊस नुकसानकारकच ठरला. एकामागून एक संकटे आली. मात्र, आज ना उद्या शेतीमालाला भाव मिळेल, या आशेपोटी शेतकरी उत्पादन घेत राहिला. मातीत पैसे टाकायचे आणि दराची वाट बघत बसायची, अशीच परिस्थिती शेतकऱ्यांची बनली आहे. सध्या कडक लॉकडाऊन सुरू आहे. त्याचाही फटका भाजीपाला पिकाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. दरम्यान, या लॉकडाऊनच्या काळातही शेतकरी आपले काम अविरतपणे पार पाडत आहेत. खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. बियाणे, खतांचे नियोजन याचा ताळमेळ शेतकऱ्यांकडून घातला जात आहे.

फोटो - २१०५२०२१-जेएवाय-०३, ०४

फोटो ओळ - ०३) शिरोळ येथे शेतामध्ये शेतकरी ऊस पिकाला पाणी देण्यात व्यस्त होता.

०४) शिरोळ येथे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतीकामे सुरू आहेत. (छाया : सुभाष गुरव, शिरोळ)