शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

बेळगाव सुवर्णसौधमध्ये शेतकरी-पोलिसांमध्ये झटापट; १० अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 23:14 IST

बेळगाव : थकीत ऊसबिल देण्याच्या मागणीसाठी रविवारी उसाचे ट्रक्टर हलगा येथील सुवर्णसौधमध्ये घुसवून आंदोलन करणाऱ्या शेतकºयांची पोलिसांबरोबर झटापट झाली. ...

बेळगाव : थकीत ऊसबिल देण्याच्या मागणीसाठी रविवारी उसाचे ट्रक्टर हलगा येथील सुवर्णसौधमध्ये घुसवून आंदोलन करणाऱ्या शेतकºयांची पोलिसांबरोबर झटापट झाली. या झटापटीत एक शेतकरी किरकोळ जखमी झाला आहे. या प्रकरणी १० शेतकºयांना अटक करण्यात आली आहे.मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी दिलेले आश्वासन न पाळल्याचा आरोप करत संतप्त शेतकºयांनी उसाचे पाच ट्रक्टर ट्रॉलीसह सुवर्णसौधमध्ये घुसविले. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मागील वर्षाच्या उसाच्या थकीत बिलाच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे.शुक्रवारी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आंदोलनकर्त्या शेतकºयांबरोबर दूरध्वनीवरून चर्चा करून सोमवारी बेळगावला येऊन समक्ष चर्चा करून ऊसबिलाचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते.मात्र, रविवारी मुख्यमंत्र्यांनी बेळगावच्या शेतकºयांना मंगळवारी बंगलोरला चर्चेसाठी बोलाविले. त्यामुळे दिलेला शब्द न पाळल्याचा आरोप करत शेतकºयांनी हे आंदोलन केले.रविवारी सकाळी आंदोलक शेतकरी एकत्र जमले. त्यांनी सुवर्णसौध गाठून उसाचे पाच ट्रक्टर ट्रॉलीसह गेटच्या आत नेत ऊस खाली टाकून आंदोलनास सुरुवात केली. त्यावेळी पोलीस आयुक्त डी. सी. राजप्पा, उपायुक्त सीमा लाटकर घटनास्थळी दाखल झाले.ट्रक्टर बाजूला करून आंदोलक शेतकºयांना ताब्यात घेतले. आंदोलक शेतकºयांना ताब्यात घेत असताना अशोक यमकनमर्डी हे शेतकरी जखमी झाले. पोलिसांनी तीसहून अधिक आंदोलक शेतकºयांना हिरेबागेवाडी पोलिसांत स्थानबद्ध केले होते. सायंकाळी पोलिसांनी दहा शेतकºयांवर गुन्हा नोंदवून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात केली आहे.