शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

‘न्यूट्रीयन्टस’ च्या शेतकऱ्यांना ५ जूनला पैसे मिळणार

By admin | Updated: May 15, 2017 17:11 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय : कामगारांचे थकीत पगार जूनपासून तीन टप्यात देणार

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. १५ : हलकर्णी (ता. चंदगड) येथील ‘न्यूट्रीयन्टस’ (दौलत) कंपनीने शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलापोटी ५ जूनला २० कोटी रूपये बॅँकेत जमा केल्यानंतर शिल्लक साखर विक्री करण्यास परवानगी द्यायची. त्याच बरोबर कामगारांचा थकीत पगारही जून पासून तीन टप्यात देण्याचा महत्वपुर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला. यामुळे शेतकरी, कामगार व कंपनी दरम्यानच्या वादावर अखेर पडदा पडला. शेतकरी, कामगार व ऊस वाहतूकदारांचे पैसे न दिल्याने कारखान्यातील साखर विक्री रोखली होती. हा वाद विकोपाला गेल्याने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार व पोलीस अधीक्षक संजय मोहिते हस्तक्षेप करत सोमवारी संबधित घटकांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केली होती. ‘न्यूट्रीयन्टस’चे प्रमुख व जिल्हा बॅँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील यांनी ‘दौलत’ भाडेतत्वावर कसा घेतला याची माहिती दिली. आतापर्यंत ८१ कोटीची गुंतवणूक केली असताना २२ कोटीसाठी पळून जाणार का? कारखान्याकडे १ लाख १२ हजार क्विंटल साखर शिल्लक असून प्रचलित दराप्रमाणे त्याची किंमत ४० कोटी होते. जिल्हा बॅँकेचे तारण कर्ज वजा जाता उर्वरित दहा कोटीत कंपनी दहा कोटी घालून शेतकऱ्यांचे पैसे देणार आहे. याबाबत शेतकरी, कामगार यांच्याशी अनेक वेळा चर्चा करूनही कामगार उध्दट बोलत असल्याचे अप्पी पाटील यांनी सांगितले. यावर हरकत घेत २०१०-११ मध्ये तासगांवकर शुगर्सनेच्या बाबतीत असाच पेच निर्माण झाल्याने तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी हाच तोडगा काढला, पण त्यांनी पैसे दिलेच नाहीत. हा अनुभव पाठीशी असल्याने आमचे पैसे मिळाल्याशिवाय साखर विक्री करू देणार नसल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संग्राम कुपेकर यांनी सांगितले. जिल्हा बॅँकेकडे साखर तारण आहे, विक्रीनंतर परस्पर बॅँकेने रक्कम वर्ग केली तर शेतकऱ्यांच्या पैशाची जबाबदारी प्रशासन घेणार का? असा सवाल कुपेकर यांनी उपस्थित केला. २७६५ रूपये दर जाहीर केला म्हणूनच शेतकऱ्यांनी तुमच्याकडे ऊस घातला, आता ‘एफआरपी’ची भाषा करू नका, असे ‘गोकुळ’ चे संचालक राजेश पाटील यांनी सांगितले. प्रलंबीत पैसे कसे उपलब्ध करून देणार याबाबत विश्वास कसा देणार, असा सवाल आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी केला. टप्या टप्याने साखर विक्री करून त्यातून शेतकऱ्यांना पैसे देण्याचा पर्याय पोलीस अधीक्षक मोहिते यांनी काढला. पण तसे शक्य नसल्याचे सांगत ५ जून पर्यंत कंपनीने शेतकऱ्यांच्या बिलापोटी वीस कोटी द्यायचे त्यानंतर साखर विक्रीस परवानगी द्यायची. जूनच्या पगारापासून प्रत्येक महिन्याला प्रलंबीत एक पगार असे कामगारांची देणी द्यायची. त्यानंतर ऊस वाहतूकदारांचे पैसे द्यावे, असा तोडगा जिल्हाधिकारी सुभेदार यांनी काढला. त्यास सगळ्यांनी मान्यता दिली. निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रातांधिकारी संगीता चौगले, पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, पोलीस निरीक्षक महावीर सकळे, गोपाळराव पाटील, सुनिल शिंत्रे, प्रतापसिंह चव्हाण, जे. जी. पाटील, अर्जून कुंभार, प्रदीप पवार आदी उपस्थित होते. गरजे एवढेच कामगार घेणार साखर कारखान्यांच्या धोरणानुसार ३५०० टन गाळप क्षमतेनुसार जेवढे कामगार गरजेचे आहेत, तेवढेच कामावर घेणार असल्याचे अप्पी पाटील यांनी सांगितले. यावर कामगार प्रतिनिधींनी हरकत घेतली, पण सहकारी कारखान्यासारखे बोलू नका, खासगी कंपनी आहे, याचे भान ठेवा, अशा शब्दात पोलीस अधीक्षकांनी कामगार प्रतिनिधींना समजावले. जिल्हा बॅँकेचा ड्रॉव्हर केन पेमेंटसाठी नव्हे जिल्हा बॅँकेशी झालेल्या करारानुसार ‘न्यूट्रीयन्टस’ ने १७ कोटीचा दुसरा हप्ता दिलेला नव्हता. बॅँकेने केन पेमेंटसाठी ड्रॉव्हर दाखवून ते पैसे मात्र करारातील पैसे वसुल करण्यासाठी वापरल्याचे तानाजी गडकरी यांनी निदर्शनास आणून दिले. चव्हाणसाहेब तुमचा फास काढला आमचे काय?‘दौलत’च्या थकीत कर्जामुळे जिल्हा बॅँकेचा परवाना धोक्यात आला होता, असे प्रतापसिंह चव्हाण यांनी सांगितले. ‘दौलत’च्या शेतकऱ्यांनी मदत केल्याने तुमच्या गळ्याभोवतीचा निघाला. आता आमच्या गळ्याला फास लागलाय, आता आम्हाला मदत करा, अशी मागणी विष्णू गावडे यांनी केली.