शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या झटक्याने कोगे विभागातील शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महावितरणच्या कोगे (ता. करवीर) उपविभागीय कार्यालयाच्या झटक्याने परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत. एकतर आठवड्यातून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महावितरणच्या कोगे (ता. करवीर) उपविभागीय कार्यालयाच्या झटक्याने परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत. एकतर आठवड्यातून चार दिवसच शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा केला जातो. त्यातही तासभर अगोदर वीज गायब होत आहे. अगोदरच उन्हाचा कडाका वाढत असल्याने पिके करपू लागली असताना महावितरणच्या करामतीने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा करावा, ही गेली अनेक वर्षेे मागणी सुरू आहे. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देणे जोखमीचे ठरत आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. तरीही महावितरण तीन दिवस रात्रीचा वीजपुरवठा करते. दिवसा वीजपुरवठा करताना त्यातही कमी दाबाने पुरवठा करणे, मध्यंतरी वीज गायब होण्याच्या तक्रारी आहेत. कोगे महावितरण कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात शनिवारी सकाळी ८.२५ ते दुपारी ४.२५ पर्यंत शेती पंपांना वीजपुरवठा केला जातो. मुळात आठ तास वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे यामधील पाच-दहा मिनिटे वेळही शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. मात्र, शनिवारी (दि. ६) निर्धारित वेळेच्या अगोदरच वीज बंद केली गेली. असे वारंवार घडत असल्याने शेतकऱ्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. काही तांत्रिक कारणामुळे तासभर अगोदर वीज बंद होत असेल तर दुसऱ्या दिवशी तेवढा कालावधी वाढवून देणे महावितरणास बंधनकारक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही.

कोट-

महावितरणच्या कोगे कार्यालयांतर्गत येणाऱ्या शेती पंपांबाबत असा प्रकार सातत्याने होत आहे. याची चौकशी होऊन शेतकऱ्यांना विनाखंडित वीजपुरवठा करावा.

- संजय जोतिराम पाटील (शेतकरी, वाकरे)