शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

‘क्षारपड’मुक्तीसाठी शेतकऱ्यांचा पुढाकार

By admin | Updated: March 14, 2017 21:34 IST

स्वखर्चातून प्रयत्न : चिंचवाडमधील सात शेतकऱ्यांचा उपक्रम

संतोष बामणे --जयसिंगपूर--शिरोळ तालुक्यात शेतजमिनी क्षारपड झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत ‘शासनाचे काम आणि सहा महिने थांब’ याचा प्रत्यय शेतकऱ्यांना आला असून, शासकीय निधीची वाट न पाहता चिंचवाड (ता. शिरोळ) येथील सात शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन सुमारे १३ एकर शेती स्वत:च्या खर्चातून क्षारपडमुक्त करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे शासनाला आतातरी जाग येणार का? असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. सिमेंटची जंगले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरोळ तालुक्यात सुमारे ३० टक्के जमीन क्षारपडयुक्त आहे. सोन्यासारखी पिके येणारी शेती क्षारपडयुक्त बनल्यामुळे तीन-चार एकर शेताचा मालकही मोलमजुरी करून आपल्या जीवनाचा गाडा चालवित आहे. त्यातच शिरोळ तालुक्यातील शिरोळ, उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाड, घालवाड, कनवाड, हसूर, शिरटी, तेरवाड, मजरेवाडी, अकिवाट, सैनिक टाकळी, राजापूर, खिद्रापूर, दानवाड, दत्तवाड यासह अनेक गावांत मोठ्या प्रमाणात क्षारपड झालेल्या जमिनी पडिक आहेत. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी लोकप्रतिनिधी यांच्याकडे क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी निधी मागणी करीत आहेत. मात्र, लोकप्रतिनिधींकडून निधी मंजूर होतो. मात्र, प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नाही. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येमुळे क्षारपड जमीनधारकांना आपले चारित्र्य चालविणे कठीण बनत आहे. त्यामुळे चिंचवाड येथील मनोहर गोधडे, दिलीप पाटोळे, अजित मिरजे, आण्णासाहेब शिरगावे, कुमार शिरगावे, अजित चौगुले, नाभिराज चौगुले यांनी आपल्या क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी स्वखर्चातून काम सुरू केले आहे. यामध्ये प्रथमत: सुमारे १३ एकर जमीनक्षेत्र क्षारपड निवडली असून, यामध्ये प्रति एकरी ७० ते ८० हजार रुपये खर्च येत आहे. तर कॉन्ट्रॅक्टरद्वारे क्षारपड जमिनीत सछिद्र पाईपलाईन करण्याचे काम सुरु केले आहे. या परिसरात जिल्हा परिषद सदस्य सावकार मादनाईक यांच्या फंडातून चिंचवाड, उदगाव गावच्या परिसरात ड्रेनेजचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे याठिकाणी होत असलेल्या कामाला या ड्रेनेजचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांचा प्रयत्नशासनाने क्षारपड जमीन सुधारण्यासाठी विविध जाचक अटी घातल्या आहेत. त्यामुळे अर्धा एकर, एक एकरच्या शेतकऱ्यांना शासनाचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे चिंचवाड येथे स्वखर्चातून क्षारपड जमीन सुधारण्यासाठी चिंचवाडच्या शेतकऱ्यांनी उपक्रम हाती घेतला आहे. स्वतंत्र निधीची गरज क्षारपड जमीन सुधारण्यासाठी शासनाने जमीन मालकाला स्वतंत्र निधी देणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकरी उर्वरीत पैसे घालून आपल्या क्षारपड जमिनी सुधारू शकेल व शासनाचा थेट निधी शेतकऱ्याला मिळेल. यादृष्टीने शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.