शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमुक्तीसाठी रस्त्यावरची लढाई

By admin | Updated: April 16, 2017 01:02 IST

राजू शेट्टी यांची घोषणा : कोल्हापुरात ४ मे रोजी मोर्चा; आश्वासने न पाळल्याने पवित्रा

जयसिंगपूर : मागील एक वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी करीत आहे. शेतकरी कर्जमुक्तीवरून संघटना आता रस्त्यावरची लढाई करणार आहे. सात-बारा कोरा होईपर्यंत संघर्ष करणारच असून, ४ मे रोजी कोल्हापूरला मोर्चा काढून पुढील आंदोलनाची घोषणा करणार आहे. शेतकऱ्यांना नव्याने उभे करायचे तर कर्जमुक्त करणे आवश्यक आहे. नरेंद्र मोदी यांनी शेतीमालाला दीडटप हमीभाव देण्याचे आश्वासन पूर्ण न केल्याने कर्जमुक्ती ही चळवळ आता आंदोलनाच्या माध्यमातून सुरू केली आहे. त्यामुळे कर्जमुक्तीच्या या लढाईत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केले.जयसिंगपूर येथे शनिवारी सिद्धेश्वर यात्री निवासमध्ये शेतकरी मेळावा झाला. यावेळी खासदार शेट्टी बोलत होते. यावेळी उसाचा दुसरा हप्ता व शेतकरी कर्जमुक्त रॅली नियोजन याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निवडून आलेले सदस्य व पराभूत झालेल्या उमेदवारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी खा. शेट्टी म्हणाले, कर्जमुक्तीचे शेतकरी हक्कदार आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतीमालातून जवळपास १२ ते १३ लाख कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याला शासनच जबाबदार आहे. उद्योगपतींना दिलेली कर्जे बुडत असताना शेतजमिनी तारण ठेवून शेतकऱ्यांनी कर्जे घेतलेली आहेत. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झाल्याशिवाय शांत बसणार नाही. देशभरातील शेतकऱ्यांचे एकूण कर्ज १० लाख कोटींच्या आसपास आहे. ते माफ करायला पाहिजे. शेतकरी कर्जमुक्ती रॅली ही फक्त सुरुवात आहे.आण्णासाहेब चौगुले यांनी स्वागत केले. यावेळी वैभव कांबळे, आदिनाथ हेमगिरे, चंदगडचे पं. स. सभापती जगन्नाथ हुलजी, आण्णासाहेब लठ्ठे, विठ्ठल मोरे, सागर शंभुशेटे, डॉ. श्रीवर्धन पाटील, पं. स. सदस्य सुरेश कांबळे, जि. प. सदस्या पद्माराणी पाटील, महिला बाल कल्याण सभापती शुभांगी शिंदे, राजेंद्र गड्यान्नावर, सावकर मादनाईक यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास डॉ. महावीर अक्कोळे, मिलिंद साखरपे, आदी उपस्थित होते. नगरसेवक शैलेश चौगुले यांनी आभार मानले.जयसिंगपूर येथे शनिवारी झालेल्या शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना खासदार राजू शेट्टी. यावेळी व्यासपीठावर आण्णासाहेब चौगुले, सुरेश कांबळे, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्यान्नावर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.