शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी ठोकले वन कार्यालयांना टाळे

By admin | Updated: February 12, 2016 01:18 IST

प्राण्यांचा बंदोबस्त करा : कार्यालयासमोर शेतकऱ्यांकडून सात-बारा उताऱ्यांची होळी, मंगळवारी प्रांत कार्यालयात बैठक

चंदगड : गेली दहा वर्षे चंदगड तालुक्यात जंगली प्राण्यांनी धुमाकूळ घातला असून, शेतकऱ्यांना ‘सळो की पळो’ करून सोडले आहे. वनविभागाने गवे, हत्ती यांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अनेकवेळा तोंडी-लेखी विनंत्या, अर्ज देऊनही वनविभागाने दुर्लक्ष केल्यामुळे गुरुवारी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वनविभागाच्या पाटणे व चंदगड येथील कार्यालयांना ‘टाळे ठोको’ आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी वनविभागाचा धिक्कार करून प्रतिगुंठा कमी नुकसानभरपाई मिळत असल्याच्या निषेधार्थ आपल्या ७/१२ उताऱ्यांचे यावेळी दहन केले.गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अ‍ॅड. संतोष मळवीकर, विवेक पाटील, विलास पाटील, बाबूराव हळदणकर, बसवंत अडकूरकर, वसंत निट्टूरकर, विनोद पाटील, नामदेव गावडे, आप्पाजी गावडे, संतोष पाटील, रामचंद्र मोरे, रूपेश अनगुडे, आदी शेतकऱ्यांनी पाटणे येथील वनकार्यालयात येऊन वनक्षेत्रपाल एस. बी. तळवडेकर यांच्याशी मागण्यांबाबत चर्चा केली.निवेदन देऊनही उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत कार्यालयाला टाळे ठोकणार असा पवित्रा घेतला. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयाला टाळे ठोकले. त्यानंतर पाटणे येथील वनविभागाचे सर्व कर्मचारी व आंदोलक चंदगड येथील वनकार्यालयाकडे आले. यानंतर अ‍ॅड. मळवीकर व आंदोलक चंदगड येथील वनकार्यालयाकडे आले असता अ‍ॅड. मळवीकर, विवेक पाटील, बाबूराव हळदणकर यांनी वरिष्ठांना बोलावून घ्या व आमच्या मागण्या मान्य करा; नाहीतर वरिष्ठ येईपर्यंत कार्यालयाला टाळे ठोकणार, अशी भूमिका घेतली. दरम्यान, भ्रमणध्वनीवरून सी. जी. गुजर यांनी उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांच्याशी चर्चा केली. नंतर ानक्षेत्रपाल तळवडेकर यानां हत्ती हटविण्यासाठी ठोस निर्णय घेण्यासंदर्भात वनविभागाच्या सचिव स्तरावरील अधिकारी यांना गडहिंग्लज येथील प्रांत कार्यालयात मंगळवारी (दि. १६) सायंकाळी चार वाजता उपस्थित ठेवणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आंदोलकांनी प्रांत कार्यालयात होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याचे मान्य करून टाळे ठोको आंदोलन मागे घेतले. (प्रतिनिधी)हत्ती हटवण्यासाठी कमी पडलोवन क्षेत्रपाल तळवडेकर यांनी उप वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी हत्ती हटविण्यात आपणही कमी पडत असल्याचे कबूल करत जिल्हाधिकारी यांच्याशी बैठकीत व्यस्त असल्यामुळे आपण येऊ शकत नसल्याचे सांगितले.