शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

हत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार पंधरा दिवसात भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 19:13 IST

forest department Kolhapur- हत्तींमुळे नुकसान झालेल्या सेनापती कापशी परिसरातील शेतकऱ्यांना वन विभागाकडून पंधरा दिवसांत नुकसान भरपाई मिळणार असून संबंधित शेतकऱ्यांनी वन विभागाशी संपर्क साधावा़ असे आवाहन वन विभागाने केले असून शुक्रवारी सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागास भेट दिली.

ठळक मुद्देहत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार पंधरा दिवसात भरपाई वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी दिली नुकसानग्रस्त भागास भेट

कोल्हापूर : हत्तींमुळे नुकसान झालेल्या सेनापती कापशी परिसरातील शेतकऱ्यांना वन विभागाकडून पंधरा दिवसांत नुकसान भरपाई मिळणार असून संबंधित शेतकऱ्यांनी वन विभागाशी संपर्क साधावा़ असे आवाहन वन विभागाने केले असून शुक्रवारी सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागास भेट दिली.दरम्यान, हा हत्ती ज्या मार्गाने वस्तीत आला होता, त्याच मार्गाने त्याला गुरुवारी वन विभागाच्या ५२ वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने जंगलाकडे मार्गस्थ केले. आता या हत्तीचा आजरा तालुक्यातील अरळकुंडी परिसरात मुक्काम आहे.या नुकसानग्रस्त भागास आज, शुक्रवारी सकाळी कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, उपवन संरक्षक आर. आर. काळे यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी फिरत्या पथकाचे वनपेत्रपाल युवराज पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकरही उपस्थित होते.पंधरा दिवसात भरपाई देण्याचे नियोजनपंचनामे लवकरात लवकर कन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंधरा दिवसात भरपाई देण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले असून आठ दिवसांत भरपाई देण्यासाठी वन खाते प्रयत्नशील आहे. यावेळी त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधीची भेट घेऊन हत्तीप्रवण भागातील शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देणार असल्याचे सांगितले आहे.वनविभागाचे स्वतंत्र पथक कार्यरत राहणारनुकसानग्रस्त भागात वनविभागाचे स्वतंत्र पथक गस्तीसाठी कार्यरत राहणार असून पुन्हा हत्तीचे दर्शन झाल्यास तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन वन विभागाने केले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे हत्तीने नुकसान केले आहे, त्यांनी तत्काळ वन विभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करवीरचे वनक्षेत्रपाल सुधीर सोनवले यांनी केले आहे.कोटजंगल परिसरातील वन्यप्राणी नागरी वस्तीत वारंवार येत असतात. अशावेळी ग्रामस्थांनी गर्दी करू नये. यावेळी हत्तीला आवरण्याऐवजी बघ्यांची गर्दीच नियंत्रित करण्यासाठी वन विभागाची शक्ती खर्च झाली. यासाठी लोकांचे प्रबोधन करण्यासाठी वन विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्याचा मानस असून ग्रामस्थांनी वन्यप्राणी आढळल्यास गर्दी करू नये, संयम बाळगावा.- सुधीर सोनवले,परिक्षेत्र वन अधिकारी, करवीरकोल्हापूर वन विभाग(संदीप आडनाईक)

 

 

टॅग्स :forest departmentवनविभागkolhapurकोल्हापूर