शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा योजनेपासून शेतकरी वंचित राहणार?

By admin | Updated: July 21, 2016 22:09 IST

शिरोळ तालुक्यातील चित्र : पेरणी दाखला मिळत नसल्याने शेतकऱ्यांतून संताप

संदीप बावचे--  जयसिंगपूर --‘शासकीय काम अन् सहा महिने थांब’ याचा अनुभव शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना येत आहे. पीक पेरणी दाखला तलाठ्यांकडून मिळत नसल्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेपासून तालुक्यातील शेतकरी वंचित राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ३१ जुलै २०१६ पर्यंत पीक विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत असून, या योजनेत सहभागी होण्यासाठी पीक पेरणी दाखला मिळत नसल्याने पूरग्रस्त शेतकरी हवालदिल झाला आहे. शिवाय पुरामुळे नुकसानीचे पंचनामे केव्हा होणार? याकडे त्याचे लक्ष लागून राहिले आहे. संततधार पाऊस आणि कृष्णेसह पंचगंगा, वारणा, दूधगंगा या नद्यांना पूर आल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जून महिन्यात सोयाबीन, भात, भुईमूग, उडीद, मूग, मिरची, आदी पिके शेतकऱ्यांनी घेतली होती. पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यातच जुलैअखेर प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे. मात्र, जिल्हा बँक असो वा नॅशनल बँक याठिकाणी शेतकऱ्यांना पीक पेरणी दाखल्याशिवाय पीक विमा योजनेत सहभागी होता येणार नाही, असे सांगण्यात आले आहे. यामुळे शिरोळ तालुक्यातील शेतकरी चांगलाच हैराण झाला आहे. पुरामुळे नुकसान झालेले पंचनामेदेखील अद्याप झाले नसल्यामुळे स्वाभिमानी युवा शेतकरी संघटनेचे विश्वास बालिघाटे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी शेतकऱ्यांनी शिरोळ तहसीलवर आपला मोर्चा वळविला.यावेळी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार पी. जी. पाटील यांना देण्यात आले. त्यानंतर या शेतकऱ्यांनी थेट तालुका कृषी कार्यालय गाठून तेथील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी महावीर चौगुले, बाबू मालगावे, संदीप कगुडे, महावीर आडगाणे, महावीर माणगावे, अजित मालगावे, सुभाष चौगुले, मारुती पुजारी, रघुनाथ बिरोजे, आदी उपस्थित होते. टाळे ठोक आंदोलनपुरामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकाचे तातडीने पंचनामे करावेत, पीक पेरणी दाखला तातडीने मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी युवा शेतकरी संघटनेच्या वतीने शिरढोण गावचावडीला टाळे ठोक आंदोलन करण्यात येणार आहे. वास्तविक पीक पेरणी दाखला देण्याची जबाबदारी तलाठ्यांची असते. मात्र, त्यांच्याकडून टाळाटाळ होत असल्याने आम्ही हे आंदोलन करणार असल्याची माहिती यावेळी विश्वास बालिघाटे यांनी दिली. दहा दिवस राहिलेराष्ट्रीय कृषी विमा रद्द करुन प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे. जे शेतकरी विविध वित्त संस्थांकडून पीक कर्ज घेतात, अशा सर्व शेतकऱ्यांना योजना बंधनकारक करण्यात आलेल्या आहेत. या योजनेत शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०१६ पर्यंत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असले तरी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे आणि पीक पेरणी दाखला मिळत नसल्याने शिरोळ तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.