शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
4
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
5
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
6
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
7
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
8
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
9
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
10
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
11
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
12
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
13
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
14
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
15
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
16
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
17
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
18
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
19
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
20
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

केएमटी बसेस खरेदीचा मार्ग मोकळा

By admin | Updated: August 31, 2014 00:30 IST

वर्कआॅर्डर दिली : ९१ लाखांचा अ‍ॅडव्हान्स देणार

कोल्हापूर : महानगरपालिका परिवहन (केएमटी ) प्रशासनाने आपल्या ताफ्यात १०४ नव्या कोऱ्या बसेस खरेदीसाठी संबंधित ठेकेदारास वर्कआॅर्डर दिल्याने बस खरेदी प्रक्रियेतील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. वर्कआॅर्डर दिल्यापासून पंधरा दिवसांत केएमटीने ९१ लाख रुपयांचा अ‍ॅडव्हान्स द्यायचा असून त्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्याकडे सहीकरिता पाठविला आहे. महानगरपालिका परिवहन विभागास केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेतून १०४ बसेस खरेदी करण्याकरिता ४४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याकामी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुढाकार घेतल्याने अन्य शहरांकडे जाणाऱ्या या बसेस कोल्हापूर शहरात येण्याचा मार्ग येण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविताना परिवहन सदस्यांनी घेतलेल्या हरकतीमुळे निवडणूक आचारसंहितेत हे काम अडकते की काय, अशी शंका निर्माण झाली होती; परंतु कंपनीने या हरकतींचे स्पष्टीकरण दिल्यामुळे सदस्यांचेही समाधान झाले. आता सर्व अडथळे दूर झाले आहेत.केएमटीची सध्या आर्थिक स्थिती फारच बिकट आहे. त्यामुळे नवीन गाड्या ताफ्यात आल्याखेरीज केएमटी मार्गाचे पुनर्नियोजन करणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत केएमटीचा नवीन बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव आता मार्गी लागला आहे. एकावेळी १०४ बसेस खरेदी करण्याचा केएमटीच्या मागच्या ५० वर्षांतील हा पहिलाच प्रयोग आहे. (प्रतिनिधी)