शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळच्या गोविंदांचा नावलौकिक

By admin | Updated: August 11, 2014 22:42 IST

तीस वर्षे सातत्य : दहीहंडी फोडण्याची परंपरा

शिरोळ : डॉल्बीचा दणदणाट, आकर्षक विद्युत रोषणाई आणि गोविंदा आला रे.. आला अशा जल्लोषपूर्ण वातावरणात यंदाही दहीहंडी फोडण्यासाठी शिरोळची गोविंदा मंडळे सज्ज झाली आहेत. मानाच्या दहीहंड्या फोडून येथील गोविंदांनी नावलौकिक मिळवला असून गेल्या ३० वर्षापासून दहीहंडी फोडण्याची परंपरा सातत्याने सुरू आहे. शिस्त, सांघिकपणे लोक चळवळीतून शिरोळच्या ऐतिहासिक नगरीत सन १९८४ सालापासून धनाजी पाटील-नरदेकर यांच्या नेतृत्वाखाली अजिंक्यतारा मित्रमंडळाने दहिहंडी फोडण्याचा उपक्रमास सुरूवात केली. या मंडळाने ५१ रूपये बक्षिसाची पहिली दहीहंडी फोडली. १९८४ पासून प्रत्येकवर्षी गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात या मंडळाने अनेक मानाच्या दहीहंडी फोडल्या आहेत. चित्तथरारक मानवी मनोरे रचत अत्यंत चपळाईने ३५ ते ३८ फूटावरची दहीहंडी फोडण्यात या गोविदांचा वरचष्मा आहे. यामुळेच कोल्हापूरातील गोकुळ दूधसंघ, महाडिक युवामंच, सराफ कट्टा, धान्य व्यापार पेठ, गुजरी तर इचलकरंजीतील वखारभाग, शिरोळमधील संभाजी चौक तसेच इस्लामपूर, पुणे, तासगाव याभागातील मानाच्या दहीहंडी अजिंक्यतारा मंडळाने फोडल्या आहेत. कालांतराने अजिक्यतारा मंडळाबरोबर जय महाराष्ट्र तरूण मंडळ, हनुमान तालिम मंडळ, गोडीविहीर कोळी गल्ली, बुवाफन मंडळ व पार्वती चौक अशी गोविंदा पथकांची मंडळे तयार झाली. अजिक्यतारा, जय हनुमान, जयमहाराष्ट्र, सम्राट-आगर, कुटवाड ही गोविंदा पथके दहीहंडी फोडून अनेक बक्षिसे मिळवत आहेत. सात थरापर्यंत मनोरे करून यंदाही गोकूळ अष्टमीनिमित्त दहीहंडी फोडण्यासाठी येथील गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. शिरोळच्या गोविंदा पथकांच्या मंडळांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. दहीहंडी फोडण्याचा उपक्रमातून बक्षिस म्हणून जी रक्कम जमा होते. त्यातूनच प्रत्येक वर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. (प्रतिनिधी)सामाजिक बांधीलकीतून गेली ३० वर्षे दहीहंडी फोडण्याचा उपक्रम आम्ही राबवीत आहोत. या उपक्रमात लहानापासून थोरापर्यंत सर्व जातिधर्मांतील लोक एकत्र येतात. सुमारे पाचशे जणांचे हे पथक असून, दहीहंडी फोडायचीच या ईर्षेने तरूण मानवी मनोरे रचतात. जोखीम पत्करून अनेक प्रयत्नांनंतर दहीहंडी फोडण्यात यश मिळते. न्यायालयाच्या आदेशानुसार मनोरे करणार आहोत.- धनाजी पाटील-नरदेकर,अध्यक्ष, अजिंक्यतारा मंडळ.