शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा बनावट खेळ नागरिकांच्या जिवावर

By admin | Updated: January 20, 2016 01:03 IST

वर्र्षभरात नऊ ठिकाणी रंगीत तालीम : पोलिसांना प्रशिक्षणाचा अभाव, निष्काळजीपणा, अपुऱ्या साधनसामग्रीमुळे सुरक्षा धोक्यात

एकनाथ पाटील-- कोल्हापूर  जिल्हा हा अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे. देशात होणारे अतिरेकी हल्ले तसेच विविध आंदोलने, दंगली रोखण्यासाठी कोल्हापूर पोलीस सक्षम आहेत का? याचे प्रात्यक्षिक घेतले जाते; परंतु प्रशिक्षणाचा अभाव, निष्काळजीपणा, अपुऱ्या साधनसामग्रीमुळे पोलिसांचा बनावट खेळ आता नागरिकांच्या जिवावर बेतत आहे. अशा पद्धतीची रंगीत तालीम वर्षभरात नऊवेळा घेण्यात आली. कोल्हापूर जिल्हा हा अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे. जिल्ह्यातील अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर, नृसिंहवाडी, कणेरी मठ, खिद्रापूर, पन्हाळा, बाबूजमाल मस्जिद, राधानगरी, कोयना, चांदोली धरणे, आदी संवेदनशील स्थळे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहेत. देशात होणारे अतिरेकी हल्ले तसेच विविध आंदोलने, दंगली, गुन्हेगारीचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी कोल्हापूर पोलीस सक्षम आहेत का? याचे प्रात्यक्षिक घेण्यासाठी पोलीस दलातर्फे जिल्ह्यात वर्षभरात नऊ ठिकाणी रंगीत तालमी घेण्यात आल्या. नुकतेच इचलकरंजी येथे दंगल काबू प्रात्यक्षिकावेळी अश्रुधुराच्या नळकांडीचा स्फोट होऊन दोन शाळकरी मुलांसह पाचजण जखमी झाले. या घटनेवरून अशा गंभीर घटना रोखण्यासाठी कोल्हापूर पोलीस सक्षम नाहीत, हे स्पष्ट झाले. बॉम्ब निकामी करणे, दंगल काबूत आणणे, अतिरेकी हल्ल्यास प्रतिकार करणे याचे प्रात्यक्षिक यापूर्वी शहरातील विविध ठिकाणी घेतले गेले. प्रात्यक्षिक करताना त्याची पूर्वकल्पना पोलिसांना दिली जाते. त्यामुळे ते जबाबदारीने प्रात्यक्षिक न करता निष्काळजीपणे करीत असतात. अनेक वेळा प्रात्यक्षिकावेळी अधिकाऱ्यांसह काही पोलीस कर्मचारी हसत असतात. आपण एक गंभीर आॅपरेशन आॅपरेट करीत असल्याचे त्यांना भानही नसते. त्यामुळे पोलिसांचा हा बनावट खेळ आता नागरिकांच्या जिवावर बेतत आहे. पोलिसांचा खेळअचानक भरधावपणे सायरन वाजवित येणारा पोलीसगाड्यांचा ताफा, अग्निशामक दल, रुग्णवाहिका यांच्यामुळे रस्त्यावरील नागरिकांना धडकीच भरते. अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना वॉकीटॉकीवरून घटनास्थळावरील परिस्थितीचा आढावा देताना तेथील वातावरण अतिशय गंभीर असते. नागरिकांना नेमके काय झाले, हे माहीत नसते. त्यामुळे ते श्वास रोखून पाहत असतात. तास-दीड तासाने एक अधिकारी येतो आणि ही रंगीत तालीम आहे, असे सांगून जातो. त्यावर नागरिक ‘हा पोलिसांचा खेळ’ म्हणून तेथून निघून जातात. इचलकरंजीमध्ये दंगल काबू प्रात्यक्षिकावेळी जी घटना घडली ती दुर्दैवी आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. त्यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. पोलिसांनी सतर्कतेने काम केले पाहिजे. कर्तव्यामध्ये कसूर राहता कामा नये. येथून पुढे पोलिसांनी प्रात्यक्षिक करताना हलगर्जीपणा केल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. - प्रदीप देशपांडे,पोलीस अधीक्षक बॉम्ब निकामी करण्याची यंत्रणा नाहीपोलीस दलामध्ये स्वतंत्रपणे ‘बॉम्ब शोध-नाशक पथक’ पोलीस मुख्यालय येथे कार्यरत आहे. या पथकाकडे बॉम्ब शोधण्याचे यंत्र आहे; परंतु तो निकामी करण्याची अत्याधुनिक यंत्रणा नाही. त्यासाठी पुणे येथील पथकाला पाचारण करावे लागते. काही वेळा कोल्हापुरातील पथकाला जीव धोक्यात घालूनच हे काम करावे लागते. जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रात्यक्षिक घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रथमत: बॉम्ब निकामी करण्याची यंत्रणा या ठिकाणी उपलब्ध करणे अपेक्षित आहे.