शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

विमानफेरी रद्दचा आमदारांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:00 IST

कोल्हापूर : तांत्रिक कारणामुळे कोल्हापूर-मुंबई विमानफेरी एअर डेक्कन कंपनीने रविवारी रद्द केली. त्याचा फटका आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना बसला. ऐनवेळी विमानफेरी रद्द झाल्याने त्यांना वाहनाने प्रवास करावा लागला.केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत कोल्हापूर-मुंबई विमानसेवा एअर डेक्कन कंपनीने १७ एप्रिलपासून सुरू केली. या सेवेला कोल्हापुरातून चांगला प्रतिसाद ...

कोल्हापूर : तांत्रिक कारणामुळे कोल्हापूर-मुंबई विमानफेरी एअर डेक्कन कंपनीने रविवारी रद्द केली. त्याचा फटका आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना बसला. ऐनवेळी विमानफेरी रद्द झाल्याने त्यांना वाहनाने प्रवास करावा लागला.केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत कोल्हापूर-मुंबई विमानसेवा एअर डेक्कन कंपनीने १७ एप्रिलपासून सुरू केली. या सेवेला कोल्हापुरातून चांगला प्रतिसाद मिळाला. तांत्रिक कारणामुळे २६ जूनपासून उड्डाणे रद्द केली. विमानसेवा पूर्ववत सुरू होण्यासाठी खासदार संभाजीराजे आणि खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्ली येथे नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, एअर डेक्कन कंपनी यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर २९ जुलैपासून पुन्हा या कंपनीकडून ‘कोल्हापूर-मुंबई’ विमानसेवा सुरू झाली. त्यानंतर ही विमानसेवा सुरळीतपणे सुरू राहिली. मात्र, रविवारी तांत्रिक कारणामुळे या मार्गावरील विमानफेरी कंपनीने रद्द केली. या विमानातून मुंबईहून कोल्हापूरकडे आमदार डॉ. सुजित मिणचेकर येणार होते, तर कोल्हापुरातून आमदार राजेश क्षीरसागर हे मुंबईला जाणार होते. पण, विमानफेरी रद्द झाल्याने त्यांना ऐनवेळी वाहनाने प्रवास करावा लागला.विमानफेरी रद्दबाबतच्या कंपनीच्या निर्णयाबद्दल त्यांच्या अन्य प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान याबाबत ‘एअर डेक्कन’ची भूमिका जाणून घेण्यासाठी कंपनीचे कोल्हापुरातील व्यवस्थापक नंदकुमार गुरव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही.