शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस ‘बोगस’ तर सदाभाऊ ‘भामटा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:12 IST

कोल्हापूर : स्वातंत्र्यानंतर ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्या गरिबी हटाओ व पाकिस्तानच्या मुद्यावर लढल्या गेल्या; पण २०१९ ची निवडणूक ...

कोल्हापूर : स्वातंत्र्यानंतर ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्या गरिबी हटाओ व पाकिस्तानच्या मुद्यावर लढल्या गेल्या; पण २०१९ ची निवडणूक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढली जाणार आहे. ही ताकद शेतकरी नेत्यांच्या एकजुटीबरोबर चळवळीची असल्याचा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.कोल्हापुरात रविवारी एका खासगी कार्यक्रमात त्यांनी महाविद्यालयीन तरुणांसोबत दिलखुलास गप्पा मारल्या. यामध्ये रॅपीड प्रश्नावलीत ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्टÑवादीचे नेते शरद पवार व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याबद्दल एका वाक्यात तुम्हाला काय वाटते? असे प्रश्न विचारण्यात आले, यावर ‘ फडणवीस ‘बोगस माणूस’, खोत ‘भामटा’, तर शरद पवार ‘अविश्वासू’ असल्याचे सडेतोड व रोखठोक उत्तर दिली. कॉँग्रेस की बहुजन विकास आघाडीसोबत हे ठरलेले नाही; पण माझी वैचारिक भूमिका ठरलेली आहे, घटनेला आव्हान देणाºयासोबत कदापि जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.‘खात्म्या’साठी देव पाण्यात!शेतकºयांची वकिली सरकारच्या पातळीवर केल्याने अनेकजणांची अडचण झाली; त्यामुळेच माझा खात्मा करण्यासाठी देव पाण्यात घातले आहेत; पण जोपर्यंत शेतकरी माझ्यासोबत आहे, तोपर्यंत आपण बिनधास्त असल्याचेही ते म्हणाले.परवानगी द्या वजनकाटे उभे करूखासदार निधीतून गावागावांत वजनकाटे उभारण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाची परवानगी घेतली; पण स्थानिकची मिळ त नाही. मतदारसंघातच नव्हे राज्यात कोणीही काट्याची मागणी केली, तर तिथे काट्यासाठी निधी देऊ, असे शेट्टी यांनी सांगितले.आवाडेंना पाठिंबा देण्याचा प्रश्न नाहीघराणेशाहीविरोधात आपण आहोत, सदाभाऊंना ‘स्वाभिमानी’ खासगी कंपनी करायची होती, हे चालणार नाही, याच भूमिकेतून सागर खोतला विरोध केला. गेल्या निवडणुकीत कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याविरोधात लढलो, मग जिल्हा परिषद निवडणुकीत राहुल आवाडेंना पाठिंबा दिला कसा? हा आरोप चुकीचा असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.शेट्टींना विचारलेलेप्रश्न, कंसात उत्तरेशेतकरी की लेखक (लेखक)दिल्ली की मुंबई (केव्हाही दिल्लीच)कोणाची भीती वाटते(भीतीच नाही)राग आला तर (डोळे मिटतो)मनाला लागलेला आरोप(जमिनी घेतल्याचा)काय करायला नको होते (महायुती)शेतकºयांच्या घामापुढे राजकारण खड्ड्यात!ते म्हणाले, शेतकºयांसाठीच आम्ही राजकारणात सक्रीय आहोत, ‘हातकणंगले’ मतदारसंघात १४ साखर कारखाने आहेत, ‘एफआरपी’साठी त्या सगळ्यांना अंगावर घेतले आहे. राजकारण गेले खड्ड्यात, शेतकºयांच्या घामाचे पैसे महत्त्वाचे आहेत. कोणाच्यात दम असेल, तर अशी उघड भूमिका घ्यावी.