शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

कारखानदारांत होणार उसासाठी मारामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 01:00 IST

विभागात ४० लाख टन ऊस घटणार : दुष्काळ, अतिवृष्टीमुळे कोल्हापुरात सर्वाधिक फटका

राजाराम लोंढे -- कोल्हापूर--दुष्काळ, अतिवृष्टीमुळे यंदा कोल्हापूर विभागातील उसाचे उत्पादन किमान ४० लाख टनांनी घटण्याची शक्यता असून, ऊस मिळवून हंगाम यशस्वी करण्यासाठी साखर कारखानदारांमध्ये मारामारी होणार, हे नक्की आहे. कमी ऊस उत्पादनाचा फटका कोल्हापूर जिल्ह्यात बसणार असून, गेल्या दहा वर्षांतील नीचांकी गाळप होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. कधी नव्हे ती दुष्काळाची झळ यंदा कोल्हापूर जिल्ह्याला बसली. जानेवारीपासूनच पाटबंधारे विभागाने पाणीकपातीचे धोरण अवलंबल्याने ऊसपिकाला झटका बसला. कागल, राधानगरी, भुदरगड, करवीर, हातकणंगले, शिरोळ या तालुक्यांतील ऊस पाण्याअभावी अक्षरश: करपून गेला. कसाबसा उभा ऊस तोडून कारखान्याला पाठविल्यानंतर हताश होऊन ऊस काढला आहे. सर्वाधिक उसाचे क्षेत्र या सहा तालुक्यांत असल्याने त्याचा परिणाम आगामी गळीत हंगामावर होणार आहे. दुष्काळातून काहीशा वाचलेल्या उसाला अतिवृष्टीचा फटका बसला. विशेषत: नदीकाठचा ऊस पुराच्या पाण्याखाली गेल्याने त्याच्या उत्पादनात घट येणार आहे. गतहंगामात कोल्हापूर जिल्ह्णात १ कोटी ४६ लाख ४ हजार टन, तर सांगली जिल्ह्णात ८० लाख १ हजार टन असे विभागात २ कोटी २६ लाख ९५ हजार टनांचे गाळप झाले होते. कारखान्यांचा हंगाम सहा महिने पूर्ण क्षमतेने चालला होता; पण आगामी हंगामात कारखानदारांची दमछाक होणार, हे नक्की आहे. कोल्हापूर जिल्ह्णातील सध्याचे उसाचे क्षेत्र पाहिले तर लागण ७१ हजार ३५३ हेक्टर, तर खोडवा ६१ हजार २७८ असे १ लाख ३२ हजार ६३१ हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. जिल्ह्णाचा सरासरी उसाचा उतारा हेक्टरी ७९ टन गृहीत धरला तर १ कोटी ४ लाख ७७ हजार गाळप होण्याची शक्यता आहे. सध्या सांगली जिल्ह्णात ७२ हजार ३५८ हेक्टरवर ऊस आहे. येथील उसाचा सरासरी उतारा ८० टन गृहीत धरला तर ५१ लाख ८८ हजार टन गाळप होईल, असे अपेक्षित आहे. याशिवाय दोन्ही जिल्ह्णांतील कारखान्यांना परजिल्ह्णांतून २५ लाख टन ऊस गाळपास येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गतहंगामाची तुलना करता, किमान ४० लाख टन ऊस कारखान्यांना कमी पडण्याचा अंदाज आहे. सर्वच कारखान्यांच्या शेती विभागाला ऊस उपलब्ध करण्यासाठी आतापासूनच कंबर कसावी लागणार आहे.