शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील कारखाने सुरू मग कोल्हापुरातच बंद का?

By admin | Updated: November 5, 2015 00:39 IST

ऊस हंगामाची कोंडी : संघटना व कारखानदार आपल्या भूमिकांवर ठाम; पण शेतकरी अस्वस्थ

कोल्हापूर : गत हंगामातील ‘एफआरपी’ न देता सोलापूर जिल्ह्यातील १८ साखर कारखाने सुरू आहेत; पण पूर्ण ‘एफआरपी’ देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांची धुराडी अद्याप थंड कशी? अशी विचारणा आता होऊ लागली आहे. ऐन गळीत हंगामात शेतकरी संघटना व कारखानदार आपापल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत; पण दिवसेंदिवस शेतकरी मात्र अस्वस्थ होऊ लागला आहे. एकरकमी एफआरपी पाहिजे, या भूमिकेवर शेतकरी संघटना ठाम आहे, तर साखरेचे दर पाहता ती देणे शक्य नसल्याचे सांगत साखर कारखानदार थंड आहेत. गत हंगामात शेतकरी संघटना ‘एफआरपी’प्रमाणे दर द्या, अशी भूमिका घेत कागदावरची लढाई केली होती. त्यामुळे बहुतांश कारखाने १ नोव्हेंबरला सुरू झाले; पण या हंगामात शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपीचा मुद्दा पुढे करीत आक्रमक भूमिका घेतल्याने पेच तयार झाला आहे. गत हंगामात कोल्हापूर वगळता इतर ठिकाणी टप्प्याटप्प्यानेच ‘एफआरपी’ दिली होती. सोलापूर जिल्ह्यातील केवळ पांडुरंग साखर कारखान्याने पूर्ण एफआरपी अदा केली आहे. तिथे तब्बल १८ साखर कारखाने जोमात सुरू आहेत; पण कोल्हापुरातील सर्वच कारखान्यांनी एफआरपी दिली असताना येथील कारखाने बंद कसे? अशी विचारणा होऊ लागली आहे. कारखानदारांनी शेतकरी संघटनांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गाळप हंगाम जेवढा लांबविता येईल, तेवढा लांबविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शेतकरी संघटनांनी साखर कारखान्यांबरोबर सरकारला कोंडीत पकडण्यासाठी एकरकमी एफआरपीचा गुंता वाढविण्याची रणनीती आखली आहे. या सर्व खेळात शेतकरी मात्र पुरता अडचणीत आला आहे, हे मात्र निश्चित आहे. हंगाम लांबल्यास कारखान्यांची पाळीपत्रके विस्कळीत होणार असून, मार्च-एप्रिलपर्यंत कारखाने सुरू राहिले, तर पाण्याअभावी शेतकऱ्यांना उसाऐवजी वाळलेली खोडवीच तोडून घालावी लागणार आहेत. विहिरीवरील उसाची पिके डिसेंबरनंतरच अडचणीत येणार आहेत. भूजल पातळी खालावल्याने जानेवारी महिन्यातच विहिरी तळ गाठणार आहेत. (प्रतिनिधी)हंगाम वाढल्याने शेतकरीच गोत्यातहंगाम लांबल्याने साखर कारखानदारांचा तोटा होत नाही. उसाची तोड लांबली तर साखर उतारा वाढतो; पण उसाचे वजन घटते.यंदातर पाण्याअभावी अधीच अडचणीत आलेला शेतकरी हंगाम लांबल्याने अधिकच गोत्यात येणार आहे.आयुक्त कार्यालयाची बघ्याची भूमिकादुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वास्तविक साखर आयुक्तांनी हस्तक्षेप करीत कारखान्यांना गाळप लवकर सुरू करण्याचे आदेश देणे अपेक्षित होते; पण आम्ही परवाना दिला ना, मग हंगाम सुरू करण्याची जबाबदारी कारखान्यांची, असे हात झटकल्याने हा पेच तयार झाला आहे.