शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

हसत-खेळत गणिताचे शिक्षण घेण्याची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 22:54 IST

संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : आदर्श हायस्कूल भामटेमधील गणित विषयाचे शिक्षक मच्छिंद्र रघुनाथ कुंभार यांच्या नवोपक्रमास ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : आदर्श हायस्कूल भामटेमधील गणित विषयाचे शिक्षक मच्छिंद्र रघुनाथ कुंभार यांच्या नवोपक्रमास राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे. ‘फॅसिलिटेट मॅथेमेटिकल कन्सेप्ट वुइथ द हेल्प आॅफ सेल्फ-मेड इंटरॅक्टिव्ह अ‍ॅनिमेटेड फ्लिपबुक आॅफ नाइंथ स्टँडर्ड मॅथ्स पार्ट-वन’ या नवोपक्रमाने गणिताचे शिक्षण मनोरंजक, आनंददायी होणार आहे. त्यांच्या उपक्रमाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याबाबत कुंभार यांच्याशी साधलेला हा थेट संवाद.प्रश्न : या नवोपक्रमाची कल्पना कशी सुचली?उत्तर : कोणत्याही शाळेतील विद्यार्थी असू दे, त्याच्या मनात गणित विषयाची भीती असतेच; मात्र, खरच हा विषय इतका भीतीदायक आहे, की शिकविण्याची पद्धती सदोष आहे, असे प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाले. त्यावर माझ्या हायस्कूलसह अन्य चार शाळांतील विद्यार्थ्यांशी मी संवाद साधला. त्यातून माझ्या लक्षात आले, की खडू-फळा, तक्ते या पारंपरिक शिक्षण पद्धतीला विद्यार्थी कंटाळले आहेत. आजची पिढी बालपणापासूनच ‘टेक्नोसॅव्ही’ असल्याने त्यांना त्यांच्या पद्धतीनुसार शिक्षण देण्याची गरज आहे. ते लक्षात घेऊन मला अ‍ॅनिमेटेड फ्लिपबुक तयार करण्याची कल्पना सुचली.प्रश्न : ‘अ‍ॅनिमेटेड फ्लिपबुक’ची संकल्पना कशी आहे?उत्तर : इयत्ता नववीच्या गणित भाग एकच्या १३६ पानांच्या पुस्तकाचे ‘अ‍ॅनिमेटेड फ्लिपबुक’मध्ये रूपांतर केले. त्यामध्ये गणिताची उदाहरणे, स्वाध्याय, प्रश्नसंग्रह, गणित तज्ज्ञांची आॅनलाईन माहिती, परिपाठाची परिपूर्णता, आदींचा समावेश आहे. प्रत्येकी ६२ व्हिडीओ, आॅडिओ आहेत. फ्लिप्ड इमेजीस (सरकती चित्रे), ‘एसडब्ल्यूएफ’ इमेजीसचा वापर केला आहे; त्यामुळे गणिताचे शिक्षण हे मनोरंजक, आनंददायी बनले आहे. यासाठी मला सात महिने लागले. एक रुपयाचाही खर्च आला नाही. त्यासाठी मुख्याध्यापक दत्ता पाटील, सर्व शिक्षक सहकारी, जिल्हा तंत्रस्नेही टीमची मदत झाली.प्रश्न : या बुकचा उपयोग कसा होणार आहे?उत्तर : या बुकमध्ये ज्ञानरचनावादावरती गणितातील सर्व घटकांची रचना केली आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आनंददायी शिक्षण संकल्पना रुजविली आहे. ४५ मुलांना पहिल्यांदा पारंपरिक पद्धतीने आणि नंतर या फ्लिपबुकद्वारे शिक्षण दिले. त्यात फ्लिपबुकच्या माध्यमातून दिलेल्या शिक्षणाचा चांगला परिणाम दिसून आला. या बुकद्वारे शिक्षण दिल्याने गणिताबाबतची विद्यार्थ्यांमधील भीती दूर होणार आहे. त्यांना अध्ययनाची नवी दिशा मिळणार आहे. अभ्यासाबाबतची सक्ती हा प्रकार राहणार आहे.गणिताचीविशेष आवडसांगरूळ हे माझे गाव. न्यू कॉलेजमधून बी. एस्सी.ची पदवी घेतली. त्यानंतर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करण्याचे ध्येय होते; मात्र, घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने बी. एड. पूर्ण करून शिक्षक म्हणून काम करण्याचे ठरविले. खराडे कॉलेजमधून बी.एड.ची पदवी घेऊन सन २००३ पासून भामटे येथील आदर्श हायस्कूलमध्ये कार्यरत आहे.विविध ८० मोबाईल अ‍ॅपची निर्मितीकुंभार यांनी पहिली ते दहावीपर्यंतच्या गणित विषयाची ५५, इंग्रजी आणि मराठीची प्रत्येकी १0, तर विज्ञानचे पाच मोबाईल अ‍ॅप तयार केले आहेत. त्यांना टीचर इनोव्हेशन, इनोव्हेशन प्रॅक्टिसेस इन स्कूल एज्युकेशन, सोशल मीडिया-महामित्र, आदी पुरस्कार मिळाले आहेत. दहावीच्या गणित भाग एक, दोन विषयांचे फ्लिपबुक करण्याचे त्यांचे ध्येय आहे.