शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

उज्ज्वल भविष्यासाठी ‘नॅक’ला सामोरे जा

By admin | Updated: January 3, 2015 00:13 IST

जगन्नाथ पाटील : शिवाजी विद्यापीठात जाणीव जागृती कार्यशाळेचा प्रारंभ

कोल्हापूर : विद्यापीठ अनुदान आयोग अथवा राज्य शासनाने सक्ती केली आहे म्हणून नव्हे तर, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शैक्षणिक संस्थांनी ‘नॅक’ मूल्यांकनाला सामोरे जायला हवे, असे प्रतिपादन राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेचे (नॅक) प्रभारी सल्लागार डॉ. जगन्नाथ पाटील यांनी आज, शुक्रवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षातर्फे ‘नॅक’च्या सहकार्याने महाविद्यालये व संस्थांसाठी आयोजित केलेल्या दोनदिवसीय जाणीव जागृती कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठातील वि. स. खांडेकर भाषा भवनात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार होते.डॉ. पाटील म्हणाले, खरे तर गुणवत्ता ही ज्या-त्या संस्थेची जबाबदारी असते; तथापि, पण गुणवत्ता आणि दर्जा यांच्याविषयी जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी ‘नॅक’ची गरज आहे. स्पर्धेच्या युगात अशा संस्थेची नितांत गरज होती. ‘नॅक’च्या बाबत आमच्या उद्दिष्टाच्या साधारणत: १५ टक्के उद्दिष्टपूर्तीपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे भारतीय शैक्षणिक संस्थांना गुणवत्तेच्या बाबतीत खूप मोठा पल्ला पार करायचा आहे म्हणूनच राष्ट्रीय उच्चशिक्षण अभियानांतर्गत गुणवत्तेबाबत जगजागृती करण्याची जबाबदारी ‘नॅक’ने उचलली आहे. याचाच भाग म्हणून अशा कार्यशाळा होत आहेत. जागतिक स्पर्धेत आणि खाजगी विद्यापीठांच्या युगात संस्थांना टिकण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये उच्च पात्रता व कौशल्यांचा विकास करण्याची आवश्यकता आहे. हा विकास केला तर आपले विद्यार्थी जागतिक पातळीवरील कोणत्याही स्पर्धेचा आत्मविश्वासाने सामना करू शकतील. तसेच त्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होईल.कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, ‘नॅक’ ही एकवेळची नव्हे, तर निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी कसून तयारी करणे आवश्यक आहे. कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. पाटील यांच्या हस्ते रोपट्यास पाणी वाहून झाले. कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. व्ही. बी. जुगळे उपस्थित होते. बीसीयुडी संचालक डॉ. अर्जुन राजगे यांनी स्वागत केले. जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. व्ही. बी. जुगळे यांनी आभार मानले. दरम्यान, डॉ. पाटील यांनी दूरशिक्षण केंद्राची पाहणी केली. (प्रतिनिधी)गुणवत्तापूर्ण उपक्रम...आपल्या देशातील ‘अ’ मानांकित संस्थेतील तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम अमेरिकेतील चार वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या समकक्ष मानला जातो, इतके त्याचे महत्त्व प्रस्थापित झाले असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांकडून फीडबॅक, माजी विद्यार्थ्यांचा सहभाग, आयसीटी बेस्ड अध्यापन प्रणालीचा अंगीकार व आग्रह अशासारख्या गुणवत्तापूर्ण उपक्रमांची सुरुवात ‘नॅक’मुळे शैक्षणिक संस्थांमध्ये झाली.