शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

सभ्यतेच्या बुरख्याआड पुरुषी चेहरा

By admin | Updated: January 21, 2015 23:55 IST

मेसमधील कारनामे : जेवताना भिरभिरते नजर; चोरट्या स्पर्शासाठी प्रयत्न--रात्र ‘ति’च्या वैऱ्याची...

सातारा : नोकरीनिमित्तानं एकटे राहणारे पुरुष मेसमध्ये जेवायला जातात. चांगल्या नोकरीनं दिलेला सभ्यतेचा बुरखा त्यांच्या चेहऱ्यावर असतो; मात्र त्याच्याआडचा चेहरा अस्सल पुरुषीच असतो, असा मेसचालक महिलांचा अनुभव आहे.अल्प उत्पन्नगटातील अनेक महिला पतीला हातभार म्हणून मेसचा व्यवसाय करतात. अंगभूत कौशल्यच या व्यवसायात उपयुक्त ठरत असल्याने महिलांचा कल मेसकडे असतो. महाविद्यालयांच्या आसपास राहणाऱ्यांना हमखास उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय असला, तरी अशा महिलांचे अनुभव फारसे चांगले नाहीत. नोकरदार असो वा विद्यार्थी, जेवताना वाढणारी ‘स्त्री’ आहे, हे विसरत नाही. सभ्यतेचा आव आणून खाली मान घालून जेवणारा माणूसही आडून-आडून चोरटे कटाक्ष टाकतोच, हे मेसचालिका आवर्जून सांगतात. वाढताना चोरटा स्पर्श कसा होईल, याचीही अनेकजण खबरदारी घेतात.मोठ्या खानावळींमध्ये काम करणाऱ्या महिलांनाही स्वयंपाक पूर्ण झाल्यावर रात्री उशिरा घरी जाताना पुरुषी नजरांचा, छेडछाडीचा सामना करावा लागतो. बहुतांश महिला घरातील पुरुषांना रात्री न्यायला बोलावतात, असे ‘लोकमत टीम’ला आढळून आले. (प्रतिनिधी)जेवण वाढताना टोचतात नजरा‘मेसमध्ये जेवायला जाणारे पुरुष मेसमध्ये उघड-उघड असभ्य वर्तन करीत नाहीत. चांगल्या ठिकाणी नोकरीला असलेले; मात्र नोकरीनिमित्त एकटं राहावं लागलेले पुरुष मेसमध्ये जेवतात, तेव्हा आपली प्रतिष्ठा जपली जाईल, असं त्यांचं वर्तन असतं. वरवर पाहता कुणाला संशयही येणार नाही, इतक्या विनम्रतेनं ते वागत असतात. परंतु मेसचालक महिला किंवा तिच्या घरातील मुलगी वाढायला आली, तर तिला त्याची नजर टोचल्याखेरीज राहत नाही. वाढताना कारण काढून सहेतुक स्पर्श होईल आणि चुकून झाला असं वाटेल, याची काळजी घेतानाच अनेकजण पोटाबरोबरच डोळ्याची भूक शमवत असतात.रात्रीच्या वेळी काम संपवून घरी जाताना पुरुषांच्या वक्री नजरांचा त्रास होतो. अगदी फर्लांगभर अंतरावर घर असलं तरी काम संपल्यावर पती किंवा मुलगा यांना बोलावल्याशिवाय घरी जाता येत नाही.- शांताबाई चव्हाण, गोडोलीमाझ्या घरात माझी तरुण मुलगी आहे. मेसला जेवायला येणाऱ्यांचा इतर ठिकाणचा अनुभव लक्षात घेता मी आता मेस जवळजवळ बंदच केली असून, ज्यांना आमच्याकडेच मेस लावायची आहे त्यांना घरपोच डबे देणे पसंत केले आहे.- उषा जाधव, मेसचालक, सातारा