शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मातीमोल दुकाने पाहून डोळे डबडबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 00:49 IST

कोल्हापूर : गादी कारखानदार, ब्रॅँडेड सराफ पेढ्या, फर्निचर विक्रीची आलिशान शोरूम्स यांसह विविध कंपन्या, वित्तीय संस्थांची कार्यालयांनी नटलेल्या व्हीनस ...

कोल्हापूर : गादी कारखानदार, ब्रॅँडेड सराफ पेढ्या, फर्निचर विक्रीची आलिशान शोरूम्स यांसह विविध कंपन्या, वित्तीय संस्थांची कार्यालयांनी नटलेल्या व्हीनस कॉर्नरची श्रीमंती महापुराच्या तडाख्याने एका दणक्यात मातीमोल झाली आहे. महापुरामुळे या व्यावसायिकांचे करोडो रुपयांचे न भरून येणारे नुकसान झाले. या नुकसानीची भयानकता बघून व्हीनस कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील व्यावसायिक आजही भेदरलेले आहेत.महापुराच्या पाण्याने कधी नव्हे इतका व्हीनस कॉर्नर चौक तुडुंब भरला होता. स्टेशन रोड, अप्सरा गल्ली, त्रिवेणी गल्ली, ट्रेझरी गल्ली, हॉटेल पॅव्हेलियन परिसर, असेंब्ली रोड, जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर, केव्हीज पार्क, आदी परिसर आठवडाभर पाण्याखाली राहिला. शाहूपुरी आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अशी स्टेशन रोडमार्गे पुराची सीमारेषाच आखली गेली. तसे या परिसराला व्यवसायासाठी अधिक प्राधान्य दिले जात असल्याने येथे मोठ्या शोरुम्सबरोबरच स्टेशनरी, चहा विक्रेते, बेकरी, आइस्क्रीम पार्लर, चारचाकी वाहनांची दुरुस्ती व रंगरंगोटी आदी छोट्या-मोठ्या विक्रेत्यांचीही संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे या भागात तळघरांची संख्या तशी कमी आहे; पण तरीही येथे व्यावसायिकांची संख्या मोठी असल्याने त्यांना महापुराचा फटका बसला.लाखो रुपये किमतीच्या गाद्या, कापूस, किमती फर्निचर भिजले, काही छपाई व्यावसायिकांचा हजारो रुपयांचा कागद भिजला. दुकानातील रंग रस्त्यावर पसरला, असे अंगावर शहारे आणणारे चित्र या भागात होते. कर्जे काढून व्यावसायिक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पाणी आजही महापुरानंतरची भयावह अवस्था पाहताना कायम आहे. अशा अवस्थेतही येथील व्यावसायिक उभारण्याची धडपड करत आहेत.आठ महिन्यांपूर्वीचउभारला व्यवसायपृथ्वीराज देसाई आणि सतीश शेलार या दोघा मित्रांनी नोकरीतील अनुभवाच्या जोरावर आठ महिन्यांपूर्वी ‘ड्रीम कर्टन शॉपी’ सुरू केली. या आलिशान शोरूममध्ये स्प्रिंग व फोमच्या गाद्या, कर्टन, वॉलपेपर, कुशन्स, फर्निचर, संगणक, आदी किमती साहित्य होते; पण रात्रीत आलेल्या महापुराच्या पाण्यामुळे हे सर्व सुमारे साडेसातलाख रुपये किमतीचे साहित्य खराब होऊन मातीमोल बनले. पण हे दोेघे मित्र पुन्हा व्यवसायात उभारी घेण्यासाठी धडपडत आहेत. त्यासमोर स्लिपवेल आलिशान गॅलरीही सात महिन्यांपूर्वी सुुरू झाली. तेथेही पाणी शिरल्याने त्यांचेही गाद्या, फर्निचर असे लाखो रुपयांचे नुकसान झाले.गाद्या, कापूस,रंग रस्त्यावरअप्सरा चित्रमंदिराच्या पिछाडीस असणाºया गल्लीत सुमारे चार-पाच गादी तयार करण्याचे कारखाने आहेत. तसेच गाद्या विक्रीची मोठमोठी शोरूम्सही आहेत; पण या महापुराच्या कवेत हे गादी व्यावसायिक अडकले. त्यामुळे महापुरानंतर पाण्यात भिजलेल्या गाद्या, कापूस, कर्टन कापड, फोम, रेक्झिन अशा खराब झालेल्या साहित्याचे ढीग रस्त्यावर दिसत होते. एका होलसेल रंगाच्या दुकानातील रंगही यातून सुटले नाहीत. त्यांचे डबे फुटून सर्व रंग रस्त्यावर पसरले होते. या शोरूममधील मालकांसह कर्मचाऱ्यांची साफसफाईसाठी लगबग सुरू होती.