शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही एमआयडीसी वगळून हद्दवाढ

By admin | Updated: February 17, 2016 01:15 IST

प्रस्ताव शासनाकडे : आराखडा तयार करण्यासाठी लोकसंख्येचा आधार : जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ आवश्यकच असल्याच्या अभिप्रायासह अहवाल मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी राज्य शासनाकडे पाठविला. या अभिप्रायामध्ये शिरोली आणि गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतींना (एमआयडीसी)वगळण्यात यावे, असे मत व्यक्त केले आहे, तर लोकसंख्येवर आधारित हद्दवाढीचा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती डॉ. सैनी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सतरा गावांचा समावेश असणारा कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव महापालिकेने यापूर्वी शासनाकडे पाठविला आहे पण या प्रस्तावामध्ये शिरोली आणि गोकुळ शिरगाव या दोन औद्योगिक वसाहतींचा समावेश करण्यात यावा, असे मत महापालिकेने मांडले होते. बहुतांशी लोकप्रतिनिधींचा हद्दवाढीला विरोध आहे, पण हद्दवाढ झाल्याशिवाय शहराचा विकास अशक्य आहे. केंद्र सरकारच्या काही योजनांत कोल्हापूर शहराचा समावेश होण्यासाठी आवश्यक लोकसंख्या सध्या नाही. त्यामुळे ही लोकसंख्या वाढविण्यासाठी हद्दवाढ आवश्यक आहे. कोल्हापूर महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून शहराची एक इंचही हद्दवाढ झालेली नाही. त्यामुळे शहराचा विस्तार व विकास हा उभा वाढलेला आहे, तो आडवा विस्तार होणे आवश्यक आहे. त्यासाठी हद्दवाढ आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी व्यक्त करत हद्दवाढीचा प्रस्ताव मंगळवारी सायंकाळी राज्य शासनाकडे सादर केल्याचे सांगितले. याबाबत माहिती देताना डॉ. सैनी म्हणाले, कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत शासनाने आपल्याकडे वस्तुनिष्ठ अभिप्रायासह अहवाल मागितला होता, त्यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी सोमवारी चर्चा केली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत महापालिका आयुक्त पी. शिवशंकर हेही उपस्थित होते. त्यामुळे पालकमंत्र्यांचेही मत या पाठविलेल्या अभिप्रायामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. कोल्हापूर शहराची हद्दवाढ व नागरीकीकरण होणे ही काळाची गरज आहे, कोल्हापूर शहराची हद्दवाढ करताना भौगोलिक संलग्नता ग्राह्य धरली आहे. त्यानुसार लोकसंख्येवर आधारित हद्दवाढीचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. हद्दवाढीचा राज्य शासनाने निर्णय घेतल्यास त्यामध्ये समाविष्ट होणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्य शासन निधी देणार नाही, त्या ग्रामपंचायतींना महापालिकेमार्फत दत्तक घेऊनच त्यांचा विकास करावा लागणार आहे. या विकासामध्ये काही जागा आरक्षित ठेवल्या जातील, अवजड वाहनांना बाहेरच्या बाहेर रस्ता काढून मार्गस्थ केले जाईल, त्यामुळे शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होईल, असेही डॉ. सैनी म्हणाले. (प्रतिनिधी)गांधीनगरसह किती गावांचा समावेश ?राज्य शासनाला पाठविलेल्या हद्दवाढीच्या अभिप्रायाच्या अहवालात किती गावांचा समावेश, गांधीनगर गावचा समावेश असल्याबाबत मात्र डॉ. सैनी यांनी माहिती देण्यास नकार दिला; पण दोन्हीही औद्योगिक वसाहती वगळून हद्दवाढ करण्यास हरकत नसल्याबाबतचा अहवाल राज्य शासनाला पाठविल्याचे त्यांनी सांगितले.