शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढ अपरिहार्यच; प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घ्या

By admin | Updated: July 25, 2014 00:48 IST

मुंबईत बैठक : महापालिका आयुक्त बिदरी यांची प्रधान सचिवांकडे विनंती; ठोस निर्णय नाही

कोल्हापूर : शहराचा आणि शहरालगतच्या गावांचा सुनियोजित विकास करायचा असेल, तर हद्दवाढ करणे अपरिहार्य आहे. तेव्हा हद्दवाढीच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात यावा, अशी विनंती महानगरपालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी आज, गुरुवारी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांच्याकडे केली. आज मुंबईत झालेल्या बैठकीत कोल्हापूर महापालिका प्रशासनाने हद्दवाढीच्या प्रस्तावाची विस्तृत माहिती श्रीकांत सिंह यांना करून दिली.कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्राची हद्दवाढ हा सध्या शहर परिसरातील गाजत असलेला विषय आहे. महानगरपालिका प्रशासनाने हद्दवाढ करावी म्हणून आग्रह धरला आहे, तर ज्या सतरा गावांचा समावेश अपेक्षित आहे, त्या गावांतील नागरिकांनी त्याला कडाडून विरोध केला आहे. त्यातच उच्च न्यायालयाने ३१ जुलैपर्यंत हद्दवाढीबाबत निर्णय घ्यावा, असे राज्य सरकारला निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आज नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांनी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीकडे महापालिकेबरोबरच हद्दवाढीत समाविष्ट होणाऱ्या १७ गावांतील लोकांचे लक्ष लागून राहिले होते. हद्दवाढीला असलेल्या विरोधाची श्रीकांत सिंह यांना माहिती आहे. त्यामुळे महापालिकेची काय भूमिका आहे, प्रस्तावित गावांच्या लोकसंख्येची घनता, दरडोई उत्पन्न, आदी माहिती त्यांनी करून घेतली; परंतु कोणताही ठोस निर्णय यावेळी झाला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे ३१ जुलैपर्यंत हद्दवाढीचा निर्णय होण्याबाबत संदिग्धता आहे. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, नगररचना विभागाचे सहायक संचालक एम. डी. राठोड उपस्थित होते. (प्रतिनिधी)