शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आतंकवादी हल्ल्याचा तीव्र निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2016 01:05 IST

घोषणाबाजीने परिसर दणाणला : समस्त हिंदू संघटनांच्यावतीने जोरदार निदर्शने

कोल्हापूर : दहशतवाद्यांनी उरी येथील भारतीय लष्करी तळावर आत्मघाती हल्ला करून १७ जवानांना शहीद केले. या भ्याड हल्ल्याचा हिंदू संघटनांच्यावतीने सोमवारी शिवाजी चौकात तीव्र निषेध करून पाकिस्तानचा ध्वज जाळला. उत्तर काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर रविवारी पहाटे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात १७ जवान शहीद झाले तर १९ जण जखमी झाले आहेत. यावेळी झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले.हे दहशतवादी पाकिस्तानमधील ‘जैश-ए-महंमद’ या दहशतवादी संघटनेचे आहेत. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी हिंदू संघटनांच्यावतीने तीव्र पाकिस्तानचा विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली तसेच पाकिस्तानचा झेंडाही जाळण्यात आला. आंदोलनात चंद्रकांत बराले, जयदीप शेळके, शिवाजीराव ससे, संजय कुलकर्णी, शरद माळी, अवधूत भाटवे, संग्राम घोरपडे, अ‍ॅड. सुधीर जोशी, मधुकर नाझरे, शिवानंद स्वामी, बाबासो भोपळे, प्रसाद कुलकर्णी, अजिंक्य पाटील, अविनाश शिंदे, विक्रम धर्माधिकारी, कृष्णा बाबर, अजय पाटील, अमित हावळ यांच्यासह आंदोलनात हिंदू एकता, हिंदू महासभा, शिवप्रतिष्ठान,हिंदू जनजागृती समिती, वंदे मातरम् या संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.