शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
4
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
5
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
6
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
7
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
8
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
9
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
10
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
11
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
12
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
13
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
14
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
15
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
16
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
17
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
18
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
19
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
20
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी

महापालिका निवडणुकीपूर्वीच हद्दवाढ

By admin | Updated: May 25, 2015 00:25 IST

शासन अनुकूल : महापालिकेस तातडीने प्रस्ताव पाठविण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

कोल्हापूर : कोल्हापूरची हद्दवाढ नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. प्रशासनाकडून हद्दवाढीचा नवा प्रस्ताव आल्यास महापालिका निवडणुकीपूर्वी त्याला तत्काळ मंजूर देऊ, असे ठोस संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिले.राजकीय कारणास्तव होणाऱ्या विरोधामुळेच शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव नाकारण्यात येत असल्याचे पत्र राज्य शासनाने दोन महिन्यांपूर्वीच महापालिका प्रशासनास पाठविले होते. राज्य शासनाने हद्दवाढ नाकारली तरीही आयुक्त पी. शिवशंकर यांनी हद्दवाढीचा प्रस्ताव नव्याने तयार करण्यास सुरुवात केली. शहरालगत असणाऱ्या एक ते दोन किलोमीटर परिघातील गावांचे सर्वेक्षण प्रशासनाने पूर्ण केले आहे. या गावांतील प्रमुख राजकीय व्यक्तींची व्यापक बैठक घेऊन हद्दवाढीचे फायदे महापालिका प्रशासन समजावून सांगणार आहे. आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी हद्दवाढीस हिरवा कंदील दाखविल्याने प्रशासनाच्या या प्रयत्नांना बळ मिळणार आहे.महापालिका प्रशासनावर अवलंबून असणाऱ्या गावांचाच पहिल्या टप्प्यात शहरात समावेश केला जाणार आहे. शहरालगतच्या ज्या गावांत महापालिकेच्या आरोग्य, पाणीपुरवठा, अग्निशमन, के.एम.टी., आदी सेवांचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला जातो, यासह या गावांतील अर्थकारण तसेच शेतीवर अवलंबून असणारी लोकसंख्या यांची शास्त्रीय पद्धतीने माहिती संकलन करून त्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. लवकरच हा अहवाल राज्य शासनाला सादर करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे.केंद्र शासनाच्या ‘स्मार्ट सिटी’ या योजनेंतर्गत देशातील १०० शहरांचा विकास केला जाणार आहे. या योजनेत राज्यातील तब्बल दहा शहरांचा समावेश होणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक आदी मोठ्या शहरांनंतर कोल्हापूर हे सर्वांत वेगाने वाढणारे शहर आहे. मात्र, आतापर्यंत शहराची एक इंचानेही हद्दवाढ न झाल्याने शहराच्या भौतिक वाढीवर मोठ्या मर्यादा पडल्या आहेत. स्मार्ट सिटी संकल्पनेची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर होताच, या योजनेत कोल्हापूरचा समावेश करण्यासाठी प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. स्मार्ट सिटीसाठी लोकसंख्या हा महत्त्वाचा निकष असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजूबाजूच्या लोकसंख्येच्या मानाने मोठ्या आठ ते दहा गावांना विश्वासात घेऊनच राज्य शासनास लवकरच हद्दवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. हद्दवाढीचा प्रश्न निकाली काढून निवडणुका ‘कॅश’ करण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी केली असल्याची चर्चा आहे.आमचे सरकार कोल्हापूरच्या हद्दवाढीच्या विरोधात नाही. तांत्रिक कारणास्तवच हद्दवाढ नाकारल्याचे पत्र दिले असावे. महापालिका प्रशासनाने हद्दवाढीचा नव्याने प्रस्ताव पाठविल्यास महापालिका निवडणुकीपूर्वीच निर्णय घेऊ. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री नव्या प्रस्तावातील संभाव्य गावेकळंबा, उचगाव, पाचगाव, मोरेवाडी-कंदलगाव, गांधीनगर, मुडशिंगी, वळिवडे, चिंंचवाड, वसगडे.