शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

विवरणपत्र निर्धारणास वर्षाची मुदतवाढ

By admin | Updated: April 2, 2016 00:56 IST

महापालिकेला दिलासा : एलबीटीप्रश्नी शासनाचा आदेश

 सांगली : ‘एलबीटी’पोटी व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे सादर केलेल्या विवरणपत्रांचे अंतिम निर्धारण निश्चित करण्यासाठी राज्य शासनाने शुक्रवारी एक वर्षाची म्हणजे ३१ मार्च २०१७ पर्यंतची मुदतवाढ दिली. या मुदतवाढीमुळे सांगलीसह एलबीटी लागू असलेल्या सर्व महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. महापालिका क्षेत्रात ११ हजार नोंदणीकृत व्यापारी आहेत. एलबीटीअंतर्गत सुमारे ३३०० व्यापाऱ्यांनी नोंदणी केली नाही. दोन वर्षांत ५६०० व्यापाऱ्यांनी एलबीटी भरला होता. २०१३-१४ या वर्षात ४७३०, तर २०१४-१५ या वर्षात ३७०० व्यापाऱ्यांनी विवरणपत्र सादर केले. या विवरणपत्रांच्या तपासणीसाठी पालिकेने के. के. चलानी आणि कंपनी, मुंबई, राजेश भाटे व बुकटे या तीन कर सल्लागारांची नियुक्ती केली आहे. या कर सल्लागारांकडून दाखल विवरणपत्रांची तपासणी करून अंतिम मूल्यांकन निश्चित केले जाणार आहे. त्यासाठी मार्चपर्यंत ५० कोटींचे टार्गेट दिले आहे. कर सल्लागारांकडून आतापर्यंत ६०० विवरणपत्रांची छाननी झाली आहे. आतापर्यंत विवरणपत्र सादर न करणाऱ्या ८६० व्यापाऱ्यांना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. छाननी झालेल्यांपैकी ५४ विवरणपत्रांचे मूल्यांकन अंतिम टप्प्यात आले आहे, तर आठ व्यापाऱ्यांच्या विवरणपत्रांचे मूल्यांकन निश्चित करून त्यांना नोटीस बजावण्यासाठी आयुक्तांची मान्यता घेतली जात आहे. ही फाईल आयुक्तांकडे प्रलंबित आहे. विवरपत्रांचे निर्धारण निश्चित करण्यासाठी पूर्वी शासनाने ३१ मार्चपर्यंतची मुदत दिली होती. या मुदतीत काम पूर्ण होणार नसल्याने १५ दिवसांपूर्वी महापालिकेने मुदतवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्यातच शुक्रवारी शासनाने एक वर्षाची म्हणजे ३१ मार्च २०१७ पर्यंतची मुदत दिली आहे. या निर्णयामुळे सांगलीसह राज्यातील एलबीटी लागू असलेल्या सर्वच महापालिकांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)व्यापाऱ्यांच्या लुटीची आणखी संधी : अतुल शहाराज्य शासनाने एलबीटी विवरणपत्र निर्धारणास मुदतवाढ देऊन व्यापाऱ्यांना लुटण्याची एक वर्षाची संधी महापालिकांना दिली असल्याची टीका महाराष्ट्र व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अतुल शहा यांनी केली. ते म्हणाले की, एलबीटीत अनेक महापालिकांनी जकातीपेक्षा जादा उत्पन्न मिळविले आहे. तरीही विवरणपत्रांवरून व्यापाऱ्यांना पालिकेकडून त्रास सुरू आहे. सांगलीसह काही पालिकांचे उत्पन्न ५० टक्केही होऊ शकले नाही. याला व्यापारी जबाबदार नाहीत. आता मुदतवाढीमुळे पुन्हा व्यापाऱ्यांना नाहक त्रास दिला जाईल, असेही शहा म्हणाले.