सचिन भोसले- ‘कोल्हापूरचा रांगडा खेळ’ असणाऱ्या फुटबॉलच्या पंढरीत यंदा सोळा संघांनी वरिष्ठ गट ‘ए’ डिव्हीजनकरिता मागील वर्षीच्या चांगल्या कामगिरीवर यंदा सहभाग घेतला आहे. यामध्ये प्रॅक्टिस क्लब (अ) व (ब) या संघांचाही समावेश आहे. या संघांनी आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत यंदाच्या फुटबॉल हंगामात जास्तीत जास्त विजेतेपद खेचून आणण्यासाठी आपल्या खेळाच्या डावपेचांत खेळाडूंचा ‘स्टॅमिना’ वाढविण्याबरोबर कोल्हापूरबाहेरील खेळाडूंनाही संघात प्रथमच स्थान दिले आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात प्रॅक्टिस क्लबच्या दोन्ही संघांची रणनीती काय असणार आहे, याबद्दल सर्वसामान्य फुटबॉलशौकिनांना उत्सुकता लागून राहिली आहे. यंदा प्रथमच प्रॅक्टिस क्लबने कोल्हापूरबाहेरील खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिले आहे. यामध्ये अविनाश शेट्टी (डेक्कन पुणेचा खेळाडू, मूळ मिरज), अभिषेक बाबर (डेक्कन पुणे, मूळचा मिरज) यांचा समावेश आहे. हंगामात लीगसह सर्व स्पर्धांचे विजेतेपद आपल्याकडेच राहावे यासाठी क्लबच्या व्यवस्थापनाने प्रत्येक खेळाडूचा ४०-४० मिनिटांच्या खेळाच्या सामन्यात ‘स्टॅमिना’ राखून ठेवण्यासाठी किमान १२० मिनिटे खेळाडू विना दमता खेळत राहील, अशी व्यूहरचना आणि सराव घेण्यात येत आहे. कॉर्नर किक, फ्री कीक याकरिता विशेष शूटिंगचा सरावही २२ खेळाडूंकडून करून घेतला आहे. यासाठी रवी शेळके, संतोष महाडिक, प्रताप जाधव, राजू वायचळ हे परिश्रम घेत आहेत.
प्रॅक्टिसचा भर ‘स्टॅमिना’ वाढविण्यावर
By admin | Updated: November 10, 2014 00:43 IST