शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव ‘एस्टिमेट’चा फुगा फोडला

By admin | Updated: August 13, 2016 00:39 IST

महापालिकेची फसवणूक टळली : २७ लाख ५८ हजारांचे काम वाढविले होते ५५ लाखांपर्यंत

कोल्हापूर : कोणत्याही विकासकामांच्या एस्टिमेटवर अलीकडे संशय बळावत चालला आहे. त्यातूनच चुकीच्या पद्धतीने वाढीव रकमेची एस्टिमेट करून महानगरपालिकेच्या निधीची उधळपट्टी होत असल्याच्या तक्रारी होत होत्या. नगरसेवक सत्यजित कदम व अजित ठाणेकर यांनी जयंती नाला उपसा केंद्रातील विविध कामांसाठी अधिकाऱ्यांनी फुगवून तयार केलेल्या ५५ लाख २१ हजार ८०३ रुपयांच्या एस्टिमेटचा पर्दाफाश केला आणि महानगरपालिकेची होणारी फसवणूक टाळली. ज्यांनी हे फुगविलेले एस्टिमेट केले, त्या अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी कदम व ठाणेकर यांनी केली आहे. जयंती नाल्यातील सांडपाणी उपसण्याकरीता दसरा चौक येथील उपसा केंद्रांत विविध कामे करावी लागणार होती. त्यामध्ये ११ के.व्ही. उच्चदाबाचे कनेक्शन एक्स्प्रेस फिडरसह लोड वाढविण्याकरीता के बल व संलग्न मटेरियल पुरविणे, उभारणी व कार्यान्वित करणे अशा कामांचा या एस्टिमेटमध्ये समावेश होता. या कामासाठी मनपाच्या अधिकाऱ्यांनी ५५ लाख २१ हजार ८०३ रुपयांचे एस्टिमेट करून ते स्थायी समितीसमोर २९ एप्रिल २०१६ रोजी ठेवले होते. त्यास नगरसेवक अजित ठाणेकर यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. हेच काम करून देण्यासाठी महावितरण कंपनीने २७ लाख ५८ हजार रुपयांत करून देण्यास सहमती दर्शविली होती; परंतु ‘महावितरण’चा प्रस्ताव बाजूला ठेऊन मनपाच्या काही अधिकाऱ्यांनी आपल्या एस्टिमेटप्रमाणे काम करून घेण्याचा अट्टाहास धरला होता. मनपाने तयार केलेले एस्टिमेट आणि ‘महावितरण’चा प्रस्ताव याचा अभ्यास केल्यानंतर अजित ठाणेकर यांनी चुकीचे एस्टिमेट असल्याचे प्रत्येक टप्प्यावर प्रशासनास पटवून दिले. केबल टाकणे, चर मारणे, त्याचा बेस तयार करणे, केबल हाप राऊंड गटरने कव्हर करणे आदी कामांबाबत प्रत्येक माप हे जवळजवळ दुप्पट धरण्यात आले होते. त्यामुळे एस्टिमेटमध्ये १३ लाखांचा फरक दिसत होता. अजित ठाणेकर व सत्यजित कदम यांनी सलग तीन सभेत हा विषय मांडला. त्यामुळे अखेर शुक्रवारी ही फुगविलेली निविदा रद्द करण्यात आली. हेच काम महावितरण २७ लाख ५८ हजार रुपयांत करुन देण्यास तयार आहे. त्यामुळे त्यांना काम देण्याचा निर्णय स्थायी समिती सभेत घेण्यात आला. नगरसेवकांच्या जागरूक व अभ्यासू वृत्तीमुळे महानगरपालिकेचे २७ लाख ६३ हजार रुपये वाचणार आहेत. ज्यांनी चुकीचे एस्टिमेट करून मनपाच्या निधीत भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केला होता त्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई करावी, अशी मागणी ठाणेकर यांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वीच एका सल्लागाराने चुकीचे एस्टिमेट तयार केल्याबद्दल त्याला आयुक्त पी. शिवशंकर यांनी नोटीस बजावली असून त्याच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. जयंती नाल्याजवळील कामात तर मनपाचे अधिकारीच सहभागी असल्याने त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे ठाणेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी) जयंती नाल्यातील सांडपाणी उपसण्याकरीता दसरा चौक येथील उपसा केंद्रांत विविध कामे करावी लागणार होती. या कामासाठी मनपाच्या अधिकाऱ्यांनी ५५ लाख २१ हजार ८०३ रुपयांचे एस्टिमेट करून ते स्थायी समितीसमोर २९ एप्रिल २०१६ रोजी ठेवले होते.हेच काम करून देण्यासाठी महावितरण कंपनीने २७ लाख ५८ हजार रुपयांत करून देण्यास सहमती दर्शविली होती; अजित ठाणेकर यांनी मनपाचे एस्टिमेट चुकीचे असल्याचे प्रत्येक टप्प्यावर प्रशासनास पटवून दिले.नगरसेवक सत्यजित कदम, अजित ठाणेकर यांची दक्षता