शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

ऊसतोडणी मजुरांचा शेतकऱ्यांना जाच

By admin | Updated: November 21, 2015 00:15 IST

टनाला ५0 ते १०० रूपयांचा फटका : प्रत्येक गाडी, ट्रॅक्टरमागे खुशालीची मागणी

चंद्रकांत पाटील -- गगनबावडा : गेल्या काही वर्षापासून ऊसतोडणी मजुरांना प्रत्येक गाडीमागे पैसे देण्याचा एक नवीनच पायंडा पडला आहे. लाच घेतल्याशिवाय ते फडाला हात लावत नाहीत. हे कारखान्याला माहीत असूनही ते संबंधितांवर कारवाई करीत नाहीत. त्यामुळे या मजुरांचे फावले आहे. लाच दिल्याने शेतकऱ्यांना सरासरी टनाला ५० ते १०० रूपयांचा फटाक बसतो. गळीत हंगाम सुरू झाला की सुरूवातीचे काही दिवस पैस न घेता मजुर तोडणी करतात नंतर मात्र ट्रक व ट्रॅक्टरला ५०० ते १००० रू असा लाचेचा दर पाडतात. शेतकरी ऊसाला तोडणी आल्यावर पैसे देण्यास नकार देवू लागला तर सरळ ऊस न तोडण्याची धमकी देतात. त्यामुळे हाता पाया पडून आणलेली तोडणी परत जाऊ नये म्हणून शेतकरी नाईलाजास्तव पैसे द्यायला तयार होतात. काही मोठ्या शेतकऱ्यांना पैसे देण्यास जरी परवडत असले तरी लहान शेतकऱ्यांना म्हणजे दहा गुंठे, अर्धा एकर किंवा एकरभर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्याला पैसे देणे परवडत नाही. तोडणीसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई म्हणून कारखाना व्यवस्थापनाला शेतकरी संघटनेने जाब विचारावा, अशी मागणी होत आहे. तसेच कारखान्यानेही याकडे गांभीर्याने पहावे, अशी मागणी होत आहे. मुबलक पाऊस : तरीही दुष्काळकोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्रात सधन समजला जातो. मात्र, त्याच जिल्ह्यातील एका भागात मुबलक पाऊस पडूनही वर्षानुवर्षे दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याचे विरोधाभासाचे चित्र पहावयास मिळत आहे. ४साठवण प्रकल्प नसल्याने धामणी खोऱ्यातील शेतकरी आपल्या जिवावर उदार होऊन स्वखर्चाने बंधारे बांधून पाणी अडवून आपली शेती जगवितो व आपणही जगतो आहे. ४दरवर्षी लाखो रुपयांचा भुर्दंड थांबविण्यासाठी या परिसरास वरदान ठरणाऱ्या धामणी प्रकल्पाचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. माझ्या आजोबा वडील यांच्या काळापासुनच धामणी नदीवर बंधारा बांधुन पाणी अडवण्याविषयी मी ऐकुन होतो. त्यांच्याप्रमाणेच मी शेती करायला लागल्यापासुन मीही मातीचा बंधारा बांधुन त्यातील पाण्यावरच शेती जगवत आहे. अन्य पर्याय नसल्याने मातीचे बंधारे बांधण्याशिवाय पर्याय नाही. बंधारे बांधले तरच या परिसरातील शेतकरी जगणार आहे. आतातरी सरकारने लक्ष द्यावे. - महिपती शंकर चौधरी, चौधधरवाडी, ता. गगनबावडा.माझे वय ८५ वर्षांच्या पुढे असुन माझ्या लहानपणापासुन अशा प्रकारे मातीचे बंधारे नदीवर बांधुन पुर्ण अडविण्याची प्रथा आहे. आमची हयात बंधारे बांधण्यात संपली. आतातरी सरकारने आमची पाण्याची सोय करून पुढच्या पिढीला या चक्रव्युहातून सोडवाव.- भाऊ बाळा पाटील, म्हासुर्ली, लाभधारक शेतकरी