शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

अवसान बाजीरावाचे अन् दुकान नाडापुडीचे

By admin | Updated: May 30, 2016 01:27 IST

हाळवणकरांची मुश्रीफांवर टीका : नंगे-पुंगे आडवे आले तरीही प्रकल्प पूर्ण करणारच

कोल्हापूर : चिकोत्रा खोऱ्याचा आपण भूमिपुत्र असल्याने येथील शेतकऱ्यांच्या सुखासाठी प्रयत्न केले तर त्यात गैर काय? पण काही मंडळींना ते रुचले नाही. एक वर्षात आपला खासगी साखर कारखाना काढता, मग नागनवाडी प्रकल्प पंधरा वर्षांत पूर्ण का होत नाही, अशी विचारणा करत हसन मुश्रीफ म्हणजे ‘अवसान बाजीरावाचे अन् दुकान नाडापुडी’चे असल्याची टीका आमदार सुरेश हाळवणकर यांनी केली. नंग्या-पुंग्यांना घाबरत नसून कोणीही आडवे आले तरी प्रकल्प मार्गी लावणारच, असा इशाराही त्यांनी दिला. तमनाकवाडा (ता. कागल) येथील पाणी परिषदेवरून गेले दोन दिवस आमदार हसन मुश्रीफ यांनी आमदार हाळवणकर यांच्यावर टीका केली होती. त्याला पाणी परिषदेत हाळवणकर यांनी उत्तर दिले. ते पुढे म्हणाले, राजकीय हेवे-दावे बाजूला ठेवून जनभावनाचा आदर करायला शिकले पाहिजे; पण काही मंडळींना २४ तास राजकारणाशिवाय काहीच सुचत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह के. पी. पाटील यांना बोलावले होते. जलसंपदा मंत्री असताना ज्यांना नागनवाडीचा प्रश्न सोडविता आला नाही, त्यांना बोलावले तर शेतकऱ्यांचा रोष ओढावून दगडफेक करतील, यासाठीच हसन मुश्रीफ यांना निमंत्रित केले नाही; पण हाळवणकरांचा कागलशी काय संबंध, अशी विचारणा करतात, आपण धामणी (आजरा) या गावचा भूमिपुत्र आहे, याचा विसर मुश्रीफ यांना पडला आहे. या परिसरातील भूमिपुत्र म्हणून येथील शेतकऱ्यांच्या जीवनात सुख आणण्यासाठी प्रयत्न केला त्यात गैर काय केले. एका वर्षात स्वत:चा साखर कारखाना उभा करता मग पंधरा वर्षे हा प्रकल्प मार्गी का लावला नाही. सत्ता गेली तरी अजून मुश्रीफ यांच्या डोक्यातील सत्तेची मस्ती गेलेली नाही. आम्हीही छत्रपती शिवाजी महाराजांची अवलाद आहे, असे नंग्या-पुंग्यांना घाबरत नाही. कितीही राजकीय ताकद आडवी आली तरी प्रकल्प पूर्ण करणारच, असा इशाराही हाळवणकर यांनी दिला. शेतकऱ्यांनी कोणाचेही ऐकू नका, तुमचा विश्वासघात केला जाणार नाही, एकीची वज्रमूठ बांधून हरितक्रांती आणूया, असेही त्यांनी सांगितले. आमदार प्रकाश आबिटकर यांनी जोरदार फटकेबाजी करत हसन मुश्रीफ यांच्यावर टीकेची झोड उठवली. ‘म्हातारीचा सडा’ पाण्याबाबत मुश्रीफ यांनी आपल्यावर टीका केली पण त्याचा दुसऱ्या प्रकल्पांवर काही परिणाम होईल का? यासाठी वनविभागाची चर्चा सुरू होती. विकासकामांत आम्ही कधीच आडवे येत नाही, येत्या चार-आठ दिवसांत त्याचे उद्घाटन होईल, असे आबिटकर यांनी सांगितले. कागलचा हत्ती अन् दादांची मिरवणूक!‘राजकारणातील स्वच्छ चेहरा’ म्हणून सामान्य माणूस चंद्रकांतदादांकडे पाहतो. वसंतदादांनंतर चंद्रकांतदादा असल्याने खूप अपेक्षा आहेत. दादा, येथील काही मंडळी हत्तीवरून मिरवणूक काढण्याची भाषा करतात. सर्व प्रकल्प मार्गी लावून १० टीएमसी पाणी अडवा, तुमची कागलमध्ये हत्तीवरून मिरवणूक काढतो, असे आमदार आबिटकर म्हणाले.