इचलकरंजी : शहरवासीयांना श्ुाद्ध व मुबलक पाणी देण्यासाठी मागणी केलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल पालिकेला आज, सोमवारी सादर करण्यात आला. सध्याच्या किमतीनुसार या प्रकल्पासाठी सुमारे ६२१ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या योजनेच्या मंजुरीसाठी पालिकेची मंगळवारी (दि. १२) विशेष सभा नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी आयोजित केली आहे. सभेच्या मंजुरीनंतर हा प्रकल्प अहवाल केंद्र व राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन योजनेला एकमताने मंजुरी दिली होती. योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम मुंबईतील एन.जे.एस. इंजिनिअरिंग प्रा.लि. या कंपनीला देण्यात आले होते. कंपनीने सर्वंकष अभ्यास करून प्राथमिक प्रकल्प अहवाल नगरपालिकेला दिला. प्राथमिक प्रकल्प अहवाल मिळाल्यानंतर नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी या योजनेची प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी काळम्मावाडीचा अभ्यास दौराही केला. त्यानंतर या योजनेचा अंतिम प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या कामाला प्रारंभ झाला होता.या पाईपलाईनला वारंवार गळतीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली असून, आत आणि बाहेर अशा दोन्ही बाजूंना कोटिंग असलेल्या उच्च दर्जाच्या पाईप्स वापरण्यात येणार आहेत. ही योजना भविष्यातील २०५१ सालातील साडेचार लाख लोकसंख्या निश्चित करून बनविण्यात आली आहे. या योजनेतून इचलकरंजीवासीयांना ९५ ते १४३ एमएलडी पाणी रोज उपलब्ध होणार आहे.आजच्या बाजारभावाप्रमाणे सुमारे ६२१ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला असला तरी भविष्यात या योजनेसाठी लागणारा वाढीव निधी शासनाकडून मंजूर करून घ्यावा लागणार आहे. ही संपूर्ण माहिती आज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांना सोपविलेल्या अहवालात स्पष्ट करण्यात आली आहे. यावेळी गटनेते बाळासाहेब कलागते, पाणीपुरवठा सभापती श्रीरंग खवरे, शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव, संभाजी काटकर, शशांक बावचकर, लतीफ गैबान, संतोष शेळके, रेखा रजपुते, सुजाता भोंगाळे, आदींनी योजनेच्या कामाची माहिती घेतली. यावेळी कंपनीचे व्ही. एन. सोनटक्के, विद्याधर वेंगुर्लेकर, मंदार पिंपूटकर, जलअभियंता बापूसाहेब चौधरी, जक्कीनकर, आदी उपस्थित होते.अशी असणार पाईपलाईनइचलकरंजी ते काळम्मावाडी अशा एकूण ८४ किलोमीटर अंतराची ही योजना आहे. या योजनेच्या पाईपलाईनचा मार्ग चंदूर, रुई, इंगळी, पट्टणकोडोली, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत, निढोरी, मुधाळतिट्टा, सोळांकूर ते काळम्मावाडी धरण असा असणार आहे. या योजनेमध्ये तीन ठिकाणी दूधगंगा नदी, तर एका ठिकाणी पंचगंगा नदीवरून पाईपलाईन टाकावी लागणार आहे. ८४ किलोमीटरपैकी ३७ किलोमीटर जमिनीखालून, तर ४७ किलोमीटर जमिनीवरून पाईपलाईन टाकली जाणार आहे. ं
६२१ कोटींचा खर्च अपेक्षित
By admin | Updated: August 5, 2014 00:16 IST