शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

अनोख्या सुटकेस कारची सफर

By admin | Updated: April 27, 2015 00:18 IST

पर्यावरणपूरक वाहन : संजीवन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची कामगिरी

कोल्हापूर : मॉलमध्ये फिरण्यासाठी, मोठ्या कंपनीत कामगारांवर लक्ष ठेवण्यासह उत्पादनांची पाहणी करण्याच्या उद्देशाने संजीवन इंजिनिअरिंग अ‍ॅँड टेक्नालॉजी इन्स्टिट्यूशनच्या चार विद्यार्थ्यांनी अनोख्या अशा सुटकेस कारची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे पर्यावरणाच्या सर्व दृष्टिकोनांतून बॅटरीवर चालणारी ही कार त्यांनी बनविली आहे. बी. ई. (आॅटोमोबाईल) अंतिम वर्षातील अमय गांगण, जुबेर बांगी, आलम फरास, मनीष पाटील यांनी ही कार बनविली आहे. वाढत्या वाहतुकीच्या समस्येमुळे पार्किंगमध्ये होणारे अडथळे समोर ठेवून या विद्यार्थ्यांनी या सुटकेस कारची निर्मिती केली आहे. ३५ किलो वजनाची ही कार कुठेही सहज घेऊन जाता येते. यामध्ये ४८ व्होल्टची मोटर बसविण्यात आली आहे. या कारमध्ये बारा व्होल्टची बॅटरी आहे. ती चार तासांमध्ये चार्जिंग होते. कारची गती ताशी २० किलोमीटर आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ४० किलोमीटरपर्यंत धावू शकते. या सर्वांना चेअरमन पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले, प्राचार्य एम. जी. देवमाने, विभागप्रमुख एस. एल. घोडके, प्रकल्प मार्गदर्शक प्रा. एम. एम. बेपारी यांचे मार्गदर्शन लाभले. शंभर किलोंची वाहतूक साधारणपणे या सुटकेस कारवरून एक माणूस सहज फिरू शकतो. याला सायकलीप्रमाणे हॅँडल व ब्रेक आहेत. शंभर किलो वजन वाहण्याची सोयदेखील आहे. ही कार बनविण्यासाठी तेरा हजार रुपये खर्च आला आहे. एक महिन्याच्या कालावधीत ही कार तयार झाली. वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी हे वाहन उत्तम आहे.