शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत ‘लेक वाचवा अभियाना’चे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: December 26, 2014 00:08 IST

प्रशासन, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : ‘अर्थ’कारण शोधण्याच्या प्रवृत्तीमुळे योजना असफल

इचलकरंजी : नवजात मुलीच्या नावे दहा हजार रुपयांची ठेव नगरपालिकेने ठेवल्यास स्त्री-भ्रूणहत्येला आळा बसेल, अशा उदात्त हेतूने येथील पालिका सभेत सर्वानुमते ठराव झाला. त्याला चार वर्षे उलटली तरी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी केलेल्या दुर्लक्षामुळे ‘लेक वाचवा अभियाना’ची मोहीम रखडली आणि आता तर तिचे अस्तित्व धोक्यात आले आहे.सन २०१० मध्ये मंजूर झालेल्या या योजनेची अंमलबजावणी प्रत्यक्षात यावी, यासाठी प्रशासनाने सर्व सोपस्कार पूर्ण करणे आवश्यक होते. तसेच खऱ्या अर्थाने निसर्गाचा समतोल राखणाऱ्या या लोककल्याणकारी योजनेचा आग्रह लोकप्रतिनिधींनी धरणे आणि शासन दरबारी पाठपुरावा करणे आवश्यक होते; पण प्रत्येक कामात ‘अर्थ’कारणाचा शोध घेणाऱ्या तथाकथित पुढाऱ्यांनी ‘लेक वाचवा मोहिमे’कडे दुर्लक्षच केल्याचे निदर्शनात येत आहे.राज्य शासनाने आता सुकन्या योजना लागू केली आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात जन्म घेणाऱ्या कन्येच्या नावे २१ हजार २०० रुपयांची ठेव शासन ठेवणार आहे. याबाबतचा विषय नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चेत आला असताना नगरपालिकेच्या चार वर्षांपूर्वीच्या तत्कालीन नगराध्यक्षा मेघा चाळके यांच्या अध्यक्षतेखालील सभेत नवजात कन्येच्या नावे दहा हजार रुपयांची ठेव नगरपालिकेने ठेवण्याच्या विषयाची आठवण आली. गेल्या सभागृहातील काही सदस्य चालू सभागृहातसुद्धा नगरसेवक आहेत, त्यांनीही जुन्या स्मृतींना उजाळा दिला.पूर्वीच्या ठरावावर चर्चा करताना उपविधीतील त्रुटी चविष्टपणे चघळण्यात आल्या, तर त्यावेळी शासनाचाच विरोध झाल्याचेही सांगण्यात आले. ही बाब पालिकेच्या कर्तव्यात बसत नसल्याचेही बोलले गेले. वास्तविक पाहता तत्कालीन लोकप्रतिनिधींनी लेक वाचवा योजनेच्या मंजुरीसाठी पुढे काहीही प्रयत्न केले नाहीत. पाठपुरावा झाला असता तर शासनाच्या सुकन्या योजनेप्रमाणे त्याचवेळी इचलकरंजी नगरपालिकेची योजना अस्तित्वात आली असती, असे जाणकारांचे मत आहे. (प्रतिनिधी)तीनशे कुटुंबांची खंतनगरपालिकेच्या तत्कालीन लेक वाचवा योजनेसाठी सुमारे तीनशे कुटुंबीयांनी अर्जही केले होते. अर्ज करण्यासाठी संबंधित कागदपत्रांची जुळवाजुळव करताना हजार-दीड हजार रुपये खर्चही घातले होते; पण सर्व काही व्यर्थ गेल्याची खंत या तीनशे कुटुंबांना आहे.