शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
3
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
4
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
5
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
6
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
7
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
8
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
9
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
11
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
12
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
13
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
15
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
16
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
17
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
19
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
20
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या

भारतीय संस्कृती उत्सवातील प्रदर्शने आज होणार खुली

By admin | Updated: January 17, 2015 00:42 IST

कारागीर, स्वयंसेवकांचा रात्रीचा ‘दिवस’; शहरातून निघणार उद्या शोभायात्रा

कोल्हापूर : चौथ्या भारत विकास संगम संमेलनातंर्गत कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठाच्या परिसरात रविवार(दि. १८)पासून आठवडाभर भारतीय संस्कृती उत्सव रंगणार आहे. त्याच्या तयारीसाठी पाच हजार कारागीर, भाविक आणि स्वयंसेवक अहोरात्र झटत आहेत. उत्सवातील विविध प्रदर्शने, देखावे आणि कलाकृती, कलादालनाचे काम उद्या, शनिवारी सायंकाळपर्यंत पूर्ण होऊन ती पाहण्यासाठी खुली करण्यासाठी संयोजकांची आज, शुक्रवारी युद्धपातळीवर तयारी सुरू होती.शेतकऱ्यांनी आपली पिकांची स्वत:च विक्री करावी तसेच विविध कारागीरांच्या कलाकृती समाजापर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने उत्सवस्थळी सहाशे स्टॉल्स्ची, प्रमुख कार्यक्रमस्थळी असलेला आठ लाख स्क्वेअर फुटांच्या मंडप उभारणी पूर्ण झाली आहे. भोजन मंडप, आयुर्वेदिक, शैक्षणिक आदी स्वरूपातील प्रदर्शनाचे मंडप उभारणीची तयारी वेगाने सुरू होती. एकेरी मार्ग, पार्किंगची व्यवस्था करण्याची लगबग दिवसभर सुरू होती. उत्सवानिमित्त रविवारी (दि. १८) सकाळी नऊ वाजता शहरातील गांधी मैदानापासून शोभायात्रा काढण्यात येईल. दरम्यान, आज पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा, पोलीस उपजिल्हा अधीक्षक अमर जाधव, भारत विकास संगमचे प्रमुख संयोजक बसनगोंडा पाटील यांनी उत्सवस्थळी भेट देऊन पाहणी केली. (प्रतिनिधी)