शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

गलेफ मिरवणूक उत्साहात

By admin | Updated: July 15, 2015 01:17 IST

बाबूजमाल साहेब उरुस : घोड्यांचा लचाजमा, सर्वधर्मियांचा सहभाग

कोल्हापूर : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या हजरत पीर बाबूजमाल साहेब (शहाजमाल) यांच्या दर्गाह शरीफ येथील उरुसानिमित्त मंगळवारी रात्री काढण्यात आलेली गलेफ मिरवणूक उत्साहात पार पडली. यावेळी सर्वधर्मीय भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. येथील बाबूजमाल दर्गाह येथे प्रतिवर्षी हा उरूस विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो. याअंतर्गत गलेफ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. फकिरांचा रतीफ खेळ झाल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात रात्री सव्वादहा वाजता गलेफ मिरवणूक काढण्यात आली. दर्गाहमध्ये फतेहा पठण झाल्यानंतर पारंपरिक वाद्ये, सजविलेल्या घोड्यांचा लवाजमा, बँडपथक आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणुकीला सुरुवात झाली. गावकामगार पाटीलवाडा येथे फतेहा पठण झाले. त्यानंतर गुजरीमार्गे जुना राजवाडा (भवानी मंडप) येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या गादीच्या ठिकाणी फतेहा पठण झाले. त्यानंतर मिरवणूक शिवाजी पुतळा येथील घुडणपीर दर्गाहमध्ये आली. तेथून पापाची तिकटीमार्गे परत बाबूजमाल दर्गाह येथे आली. येथे नाथ-सलाम करून फतेहा पठण करण्यात आले. या ठिकाणी हजरत पीर बाबूजमाल दर्गाह शरीफ यांना मान्यवरांच्या हस्ते गलेफ चढविण्यात आला. त्यानंतर प्रसाद वाटप करून उरुसाची सांगता झाली. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दर्शनासाठी पहाटेपर्यंत दर्गाह खुला ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)