शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाह्य कामांतून वगळावे

By admin | Updated: November 8, 2015 00:35 IST

शिक्षकांची मागणी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा धडक मोर्चा

कोल्हापूर : शिक्षकांना ‘बीएलओ’, ‘एनपीआर’ सर्वेक्षणे, आदी शाळाबाह्य कामांतून वगळावे, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवारी धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते. दसरा चौक येथून दुपारी मोर्चाला सुरुवात झाली. खानविलकर पेट्रोलपंपमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आला. या ठिकाणी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. तीव्र निदर्शने करीत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे यांना निवेदन सादर केले. १ नोव्हेंबर २००५नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना नवीन पेन्शन योजना लागू करावी, आंतर जिल्हा बदलीसाठी राज्यस्तरावर रोस्टर करून बदलीचा प्रश्न सोडवावा, जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या तालुकांतर्गत व महापालिका शिक्षकांच्या बदल्या आपापसात विना अट करण्यात याव्यात, शिक्षकांचे वेतन दरमहा १ तारखेला व्हावे, विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी मिळावी, पटनिकषांमध्ये सुधारणा करावी, २० पेक्षा कमी पट शाळा करूनयेत, अल्पसंख्याक व डोंगरी शाळांसाठी पटाची सवलत असावी, शाळा बांधकाम व शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडून राबविण्यात यावी, प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना उच्च शिक्षणातील फी ची सवलत मिळावी, शिक्षकांना पोलीस पंचनाम्यासाठी सरकारी साक्षीदार म्हणून बोलविण्याची सक्ती करू नये, अशा विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. आंदोलनात संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष एन. वाय. पाटील, जिल्हाध्यक्ष रवीकुमार पाटील, सरचिटणीस सुनील पाटील, बाळकृष्ण हळदकर, दुंडू खामकर, अरुण चाळके, मधुकर येसाणे, सुहास शिंत्रे, विलास पाटील, रघुनाथ खोत, दिनकर पाटील, संभाजी पाटील यांच्यासह शिक्षक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)