शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बेपत्ता माजी सैनिकाचं कुटुंब पोलिस ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : खासगी सावकारीला कंटाळून घरातून निघून गेलेले माजी सैनिक राहुल आढाव हे पत्नी आणि दोन मुलींसह तब्बल २७ दिवसांनंतर मंगळवारी दुपारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात हजर झाले. एवढे दिवस ते केरळमध्ये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत माहिती अशी की, क्षेत्रमाहुली येथील माजी सैनिक राहुल आढाव हे येथील ...

ठळक मुद्देआढाव कुटुंबाला पाहण्यासाठी गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : खासगी सावकारीला कंटाळून घरातून निघून गेलेले माजी सैनिक राहुल आढाव हे पत्नी आणि दोन मुलींसह तब्बल २७ दिवसांनंतर मंगळवारी दुपारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात हजर झाले. एवढे दिवस ते केरळमध्ये असल्याचे पोलिसांनी सांगितले.याबाबत माहिती अशी की, क्षेत्रमाहुली येथील माजी सैनिक राहुल आढाव हे येथील तामजाईनगरमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांचा तेथे फ्लॅट आहे. एका व्यक्तीने बळजबरीने त्यांचा फ्लॅट घेतल्याचा आरोप करत त्यांनी ४ जुलैला घरात ‘सुसाईड नोट’ लिहून पत्नी स्वाती, मुली समृद्धी (वय १२), सिद्धी (वय ७) यांच्यासह घर सोडले. माजी सैनिकावर अशी वेळ आल्यामुळे सर्वस्तरातून संताप व्यक्त होऊ लागला होता. त्यांच्या तपासासाठी शाहूपुरी पोलिसांनी विविध ठिकाणी पथके तैनात केली होती. मात्र, आढाव कुटुंबाचा कोठेच थांगपत्ता लागत नव्हता.राहुल आढाव यांच्या आईनेही पोलिस अधीक्षक आणि शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर धुमाळ यांना भेटून मुलाचा तत्काळ शोध घ्यावा, अशी मागणी केली होती.दरम्यान, मंगळवारी दुपारी अडीच वाजता आढाव कुटुंबीय केरळपासून साताºयापर्यंत एका ट्रकने आले. महामार्गावर उतरल्यानंतर रिक्षाने सर्वजण शाहूपुरी पोलिस ठाण्यात हजर झाले. याची माहिती माजी सैनिक राहुल आढाव यांच्या आईला समजल्यानंतर त्या पोलिस ठाण्यात आल्या. नातींना पाहून त्यांच्या अश्रूचा बांध फुटला. दोन्ही नाती आजीला बिलगल्या. हे दृष्य पाहून तेथे उपस्थित असलेल्यांनाही गहिवरुन आले. दरम्यान, या आढाव कुटुंबाला पाहण्यासाठी गर्दी झाली होती.केरळमध्ये रेल्वे स्टेशनवर वास्तव्य!राहुल आढाव यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांनी गायब झाल्यापासूनचा सर्व दिनक्रम पोलिसांना सांगितला. ४ जुलैला त्यांनी दौंड येथून रेल्वेने थेट केरळ गाठले. जाताना वाटेमध्ये राहुल आढाव आणि त्यांच्या पत्नीने दोघांचेही मोबाईल फेकून दिले. केरळमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी मंदिर आणि रेल्वेस्टेशनचा आसरा घेतला. सकाळ आणि संध्याकाळी मंदिरात ते जेवण करत तर रात्री रेल्वे स्टेशनवर झोपायचे. असे त्यांच्या लहान मुलीने पोलिसांना सांगितले.आढाव यांच्याकडे सापडले आयकार्ड !राहुल आढाव हे बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांना त्यांच्या घरामध्ये एक आयकार्ड सापडले आहे. या आयकार्डवर ‘अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो’ असा उल्लेख आहे. हे आयकार्ड आढाव यांनी कशासाठी तयार केले आहे. त्यांचा या विभागाशी काय संबंध आहे का? याचा पोलिस तपास करणार आहेत.भात खाऊन काढले दिवसआढाव कुटुंबीय साताºयातून गायब झाल्यानंतर ते थेट केरळला गेले. पैसे जवळ नसल्याने त्यांचे प्रचंड हाल झाले. भुकेने व्याकूळ झालेल्या दोन लहान मुली सतत रडायच्या. त्यांना शांत करण्यासाठी त्यांना खाण्यासाठी भात देण्यात येत होता, असे पोलिसांनी सांगितले.पोलिस करणार उलट तपास!राहुल आढाव यांनी खासगी सावकारीच्या तगाद्याला कंटाळून घर सोडल्याचे पोलिसांना सांगितले असले तरी या प्रकरणातील वस्तूस्थिती वेगळीच असल्याचे समोर येत आहे. आढाव यांनी नोकरी लावतो, असे सांगून अनेकांकडून पैसे आणल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या अनुषंगाने आढाव यांच्याकडे पोलिस तपास करणार आहेत.