शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

पोलीस आईसोबत आता रोज गमाडी गंमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:25 IST

कोल्हापूर : पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलिसांना कर्तव्याबरोबरच कौटुंबिक जबाबदारीचाही भार आहे. यातून वर्षातील बारमाही सण-उत्सवातील बंदोबस्त, गुन्हेगारी ...

कोल्हापूर : पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलिसांना कर्तव्याबरोबरच कौटुंबिक जबाबदारीचाही भार आहे. यातून वर्षातील बारमाही सण-उत्सवातील बंदोबस्त, गुन्हेगारी यामुळे वर्षभरातून अनेक वेळा ८ तासांपेक्षा अधिक काळ ड्युटी बजावण्यातच जातो. त्यामुळे कौटुंबिक जबाबदारी व कर्तव्य यावर परिणाम होत आहे. ही बाब जाणून राज्य शासनाने आठ तासांची ड्युटी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचाऱ्यासह त्यांच्या कुटुंबातील पाल्यांनीही मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. विशेषत: लहानग्यांना आपल्या आईसोबत अधिक वेळ मिळणार असल्यामुळे मोठा आनंद झाला आहे.

आईबरोबर रोज खेळता येणार

आई एकदा ऑफिसला गेली की, ती रात्रीच घरी परतते. त्यामुळे मला तिच्याबरोबर खेळता येत नाही. आता सीएम काकांनी केवळ आठ तासांचीच ड्युटी केली आहे. त्यामुळे मला आता आईसोबत ड्युटी संपल्यानंतर अधिक काळ खेळता येणार आहे. शाळेच्या अभ्यासातील प्राॅब्लेम मला तिच्याकडून सोडवून घेता येतील. आता माझे हट्ट तिला पुरवायला वेळ मिळणार आहे.

- निधा कात्रट, महिला पोलीस कर्मचारी मुलगी.

प्रतिक्रिया

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे आम्हा महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कौटुंबिक जबाबदारी सांभाळून चांगल्या प्रकारे कर्तव्यावरही लक्ष केंद्रित करता येणार आहे. कुटुंबाला जादा वेळ देता येणार असल्याने मुलांचे पालन पोषणही चांगल्या प्रकारे करता येईल, जेणेकरून संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी मदत होईल.

अश्विनी पाटील, पोलीस कर्मचारी

प्रतिक्रिया

महिला पोलिसांची ड्युटी सीएम साहेबांनी आठ तासांची केली, हे ऐकून आनंद झाला. हा सुखद धक्का आहे. या निर्णयाची गेली कित्येक वर्षे आम्ही महिला कर्मचारी प्रतीक्षा करीत होतो. पहिलेच मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी असा मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी आठवड्यातून एक दिवस सुट्टी मिळाली की, त्यात अनेक कामे एका दिवसांत करायला लागत होती. मुलांकडेही लक्ष देता येत नव्हते. सकाळी आठ वाजता ड्युटी सुरू झाली की, ती रात्री आठनंतर संपत होती. कदाचित आठचे नऊ, दहा वाजत होते. त्यामुळे कौटुंबिक जबाबदारीकडे पुरेशा प्रमाणात लक्ष देता येत नव्हते. आता या निर्णयामुळे कुटुंबाकडे लक्ष देता येईल. सीएम साहेबांना अनेक धन्यवाद.

- प्रज्ञा पंढरीनाथ पाटील, महिला पोलीस कर्मचारी.

पोलीस ठाण्यांची संख्या : ३१

एकूण पोलीस कर्मचारी संख्या - २,७५३

महिला पोलीस कर्मचारी अधिकारी संख्या - ४८३