शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राजर्षी शाहू ग्रंथ महोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल

By admin | Updated: February 10, 2015 23:53 IST

शनिवारी उद्घाटन : सांस्कृतिक कार्यक्रम, माहितीपर स्लाईड शो, बालरंजन, कवी संमेलन

कोल्हापूर : राजर्षी शाहू ग्रंथ महोत्सव समितीच्यावतीने आयोजित सहावा राजर्षी शाहू ग्रंथ महोत्सव शनिवार (दि. १४) पासून सुरू होत असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या ग्रंथमहोत्सवाच्या निमित्ताने चार दिवस भरगच्च सांस्कृतिक व माहितीपर कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथ महोत्सवासाठी प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानाला ‘आद्यचरित्रकार कृष्णराव केळूसकर ग्रंथनगरी’ तर व्यासपीठाला ‘ज्ञानपीठ विजेते वि. स. खांडेकर’ हे नाव देण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. तत्पूर्वी शहरातील प्रमुख मार्गांवरून ग्रंथदिंडी काढण्यात येईल. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध क्षेत्रांत उत्तुंग यश संपादन केलेल्या मान्यवरांच्या मुलाखती, शाळांचे सांस्कृतिक कार्यक्रम, माहितीपर स्लाईड शो, बालरंजन, गाण्यांची मैफल, कवि संमेलन असे विविध कार्यक्रम होणार आहेत. महोत्सवाचा समारोप मंगळवारी (दि. १७) दुपारी ३ वाजता होणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू डॉ. व्ही. एम. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. परिषदेस माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे, महोत्सव समितीचे उपाध्यक्ष प्राचार्य भैरव कुंभार, सचिव सी. एम. गायकवाड, खजिनदार प्रभाकर हेरवाडे, राजाराम वरुटे, रजनी हिरळीकर, उदय पाटील, संपत गायकवाड उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘आम्ही कोल्हापुरी’ स्टॉलया महोत्सवाच्या निमित्ताने ग्रंथखरेदी विक्रीतून लाखोंची उलाढाल होत असते. यंदा या महोत्सवात ‘आम्ही कोल्हापुरी’ हे विशेष स्टॉल मांडण्यात येणार आहे. हा स्टॉल फक्त कोल्हापुरातील नवोदित लेखक प्रकाशकांसाठी असणार आहेत. त्यामुळे नवोदित लेखकांना व्यासपीठ मिळणार आहे. महोत्सवातील कार्यक्रम असे सकाळी ९ वाजता : ग्रंथदिंडी, ११ वाजता : ग्रंथमहोत्सव उद्घाटन, दुपारी ३ वाजता : वाचनातून घडलो आम्ही (मुलाखतपर कार्यक्रम), संध्याकाळी ७ वाजता : शाळांचे सांस्कृतिक कार्यक्रमसकाळी ९ : हास्यबहार (सादरकर्ते : वसंत हंकारे), सकाळी ११ वाजता : आमची वाटचाल (मुलाखतपर कार्यक्रम), दुपारी ३ वाजता : शिवप्रभूंचे पहिले चरित्र म्हणजे सभासद बखर (स्लाईड शो), संध्याकाळी ७ वाजता : सांस्कृतिक कार्यक्रम सकाळी ९ वाजता : बालरंजन (सादरकर्त्या : रजनी हिरळीकर), सकाळी ११ वाजता : वाचन ही काळाची गरज (व्याख्यान), दुपारी ३ वाजता : कविसंमेलन, संध्याकाळी ७ वाजता : सांस्कृतिक कार्यक्रमसकाळी ९ वाजता : संवाद कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकास (व्याख्यान), दुपारी ३ वाजता : ग्रंथमहोत्सव समारोप, संध्याकाळी ७ वाजता : स्वराक्षरनिर्मित आपली गाणी (सादरकर्ते विश्वराज जोशी)