राम मगदूम - गडहिंग्लज -पोटनिवडणुकीत सोपविलेली पालकत्वाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळल्यानंतर या सार्वत्रिक निवडणुकीतदेखील चंदगडी मतांची ‘दौलत’ओट्यात टाकून सुज्ञ मतदारांनी आजरा-गडहिंग्लजसह चंदगडच्या पालकत्वाची जबाबदारी पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्याकडेच सोपविली. निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे नरसिंगराव पाटील यांचा त्यांनी ८१९९ मताधिक्यांनी पराभव केला. संध्यादेवींना ५१५९९, तर नरसिंगरावांना ४३४०० मते मिळाली.आजरा व गडहिंग्लज तालुक्यांतील मतमोजणीत पहिल्या टप्प्यात शिवसेनेचे नरसिंगराव पाटील यांच्याशी, गडहिंग्लजमधील दुसऱ्या टप्प्यात स्वाभिमानीचे राजेंद्र गड्यान्नावर, तर तिसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादीचे बंडखोर अप्पी पाटील यांच्याशी त्यांची लढत झाली. चौथ्या टप्प्यात चंदगड तालुक्यात त्यांचा पुन्हा नरसिंगरावांबरोबरच सामना झाला.सकाळी पावणे दहाच्या सुमारास आजऱ्यातील कोळींद्रे जिल्हा परिषद मतदारसंघातील पहिल्या फेरीचा निकाल बाहेर आला. या फेरीत संध्यादेवींना २३५२, तर नरसिंगरावांना १९९० मते मिळाली. दुसऱ्या व तिसऱ्या फेरीतही त्यांची आघाडी कायम राहिली. पहिल्या फेरीत मिळालेल्या ३६२ मतांची आघाडी सोळाव्या फेरीअखेर कायम राहिली.आजऱ्यातून ४१६२ मतांची आघाडी घेऊन गडहिंग्लज तालुक्यातील मतमोजणीत संध्यादेवींनी विजयी घौडदौड सुरू केली. मात्र, गडहिंग्लजमध्ये त्यांना नरसिंगरावाऐवजी त्यांच्याच पक्षाचे बंडखोर अप्पी पाटील यांच्याशी स्पर्धा करावी लागली. दरम्यान, गडहिंग्लज तालुक्यातील मतमोजणीत नरसिंगराव अप्पींच्यापेक्षा मागे पडले. ‘चंदगड’ची मतमोजणी सुरू होईपर्यंत ते पिछाडीवरच राहिले. तिसऱ्या फेरीत संध्यादेवींना ८३५८, तर नरसिंगरावांना ४१९६ मते मिळाली. चौथ्या फेरीअखेरच्या मतमोजणीत गडहिंग्लजच्या पूर्वभागात पहिल्यांदा संध्यादेवी विरुद्ध नरसिंगराव आणि त्यानंतर संध्यादेवी विरुद्ध गड्यान्नावर अशी लढत झाली. संध्यादेवींनी नरसिंगरावांवर चौथ्या फेरीत ६१७६ मतांची आघाडी घेतली. त्यानंतर गड्यान्नावरांवर पाचव्या फेरीत ७१९१ तर सहाव्या फेरीत ८२६३, सातव्या फेरीत ११४९१ मतांची आघाडी मिळविली. सातव्या फेरीत संध्यादेवींना २११४१, तर गड्यान्नावरांना ९६५० मते मिळाली. तथापि, आठव्या फेरीत गडहिंग्लज तालुक्यातील पूर्वेकडील हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघात संध्यादेवींचा सामना अप्पी पाटील यांच्याशी सुरू झाला. अप्पींवर त्यांनी आठव्या फेरीत १२८३६ मतांची आघाडी घेतली. त्यानंतर नवव्या फेरीत त्यांची आघाडी १७४७ मतांनी कमी झाली. दहाव्या फेरीत त्यांनी पुन्हा १२५१०, अकराव्या फेरीत १४६४०, तर बाराव्या फेरीत १५५२५ मतांची आघाडी घेतली. बाराव्या फेरीत संध्यादेवींना ३३३८६, तर अप्पींना १७८६१ मते मिळाली. तेराव्या फेरीत चंदगडच्या पूर्वेकडील गावांतही संध्यादेवी व अप्पी यांच्यात चुरस झाली. संध्यादेवींनी अप्पींवर तेराव्या फेरीत १५८८९, चौदाव्या फेरीत १६१७१, पंधराव्या फेरीत १६९०६ मतांची आघाडी घेतली. पंधराव्या फेरीअखेर संध्यादेवींनी ३७१६५, तर अप्पींना २०२५९ मते मिळाली.चंदगडपासून सुरू झालेल्या गावांच्या मतमोजणीपासून संध्यादेवींचा खरा सामना नरसिंगराव यांच्याशी सुरू झाला. मात्र, मताधिक्यात चढउतार झाला, तरी त्यांची विजयी आगेकूच कायम राहिली. सोळाव्या फेरीपासूनच त्यांची स्पर्धा नरसिंगरावांबरोबर सुरू झाली. या फेरीत संध्यादेवींना ३९२९४, तर नरसिंगरावांना २१४१८ मते मिळाली. त्यात मिळालेल्या १७८७६ मतांच्या आघाडीत फेरीगणीक घट झाली.नरसिंगरावांवरील संध्यादेवींची आघाडी सतराव्या फेरीत १५९१५, अठराव्या फेरीत १५९८१, एकोणीसाव्या फेरीत १५३६५, विसाव्या फेरीत १४३७२, एकविसाव्या फेरीत १२१९३, बाविसाव्या फेरीत ११३३५, तेविसाव्या फेरीत १०८७६, चौविसाव्या फेरीत ९००५ अशी राहिली. पोस्टल मतांसह अखेरच्या फेरीत संध्यादेवींना ५१५९९, तर नरसिंगरावांना ४३४०० मते मिळाली. ८१९९ मतांची आघाडी घेऊन त्या विजयी झाल्या. सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुणाल खेमनार व तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक झाली.राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतरही बाजीअपेक्षेप्रमाणे ‘राष्ट्रवादी’च्या संध्यादेवी, ‘शिवसेने’चे नरसिंगराव, अपक्ष अप्पी पाटील व ‘जनसुराज्य’चे संग्रामसिंह यांच्यातच चुरस झाली. मात्र, ‘काँगे्रस’चे भरमूअण्णा पाटील व ‘स्वाभिमानी’चे राजेंद्र गड्यान्नावर संध्यादेवींच्या स्पर्धेतदेखील येऊ शकले नाहीत. राष्ट्रवादीत संग्रामसिंह व अप्पी पाटील यांची दुहेरी बंडखोरी होऊनदेखील संध्यादेवींनींच बाजी मारली. माघार.. लढाई अन् विजयश्री !संध्यादेवींनी केवळ गृहकलह नको म्हणून अर्ज भरण्यापूर्वीच निवडणुकीतून माघार जाहीर केली. मात्र, कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी त्या पुन्हा रिंगणात उतरल्या. सख्खे पुतणे संग्रामसिंह व विश्वासू सहकारी अप्पी पाटील यांच्या बंडखोरीचे आव्हान भेदून त्यांनी बाबाप्रेमी कार्यकर्त्यांच्या बळावर विजयश्री खेचून आणली.राष्ट्रवादीचा नेसरीत जल्लोषआमदार संध्यादेवी कुपेकर यांनी विधानसभा निवडणुकीत बाजी मारून चंदगड विधानसभा मतदारसंघावर प्रभुत्व मिळविल्याने नेसरीसह विभागात जल्लोष करण्यात आला. नेसरी बसस्थानकाजवळ कार्यकर्ते थांबले होते. गुलालाची उधळण करीत व वाद्यांच्या निनादात घोषणा देत परिसर दणाणून सोडला. ठिकठिकाणी महिलांनी संध्यादेवींचे आरती ओवाळून स्वागत केले. त्यानंतर चंदगडकडे प्रयाण झाले. तत्पूर्वी, डॉ. नंदाताई बाभूळकर यांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या पुतळ्यासमोर उभारून मतदारांचे आभार कायकर्त्यांचाच विजयहा कार्यकर्त्यांचाच विजय आहे. स्व. बाबासाहेब कुपेकर यांचा ‘वचननामा’ पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यांची पुण्याई आणि अवघ्या दीड वर्षातील माझी कामगिरी, कार्यकर्त्यांचे प्रेम व कष्ट फळाला आले. लोकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन चंदगड मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे स्व. कुपेकरांचे स्वप्न पूर्ण करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.- संध्यादेवी कुपेकर, राष्ट्रवादीमानले.जनतेचा कौल मान्य मला जनतेचा कौल मान्य आहे. विरोधकांच्या आमिषाला तरुणाई बळी पडली. आम्ही कुठे कमी पडलो याचे आत्मचिंतन करून यापुढील वाटचाल करणार आहोत.- नरसिंगराव पाटील, शिवसेना जनसेवा सुरूच राहीलपहिल्याच प्रयत्नात जनतेने भरभरून साथ दिली. यापुढेही त्यांची सेवा प्रामाणिकपणे करीत राहीन. माझ्यासाठी राबलेले कार्यकर्ते व मतदारांचे आभार मानतो.- अप्पी पाटील, अपक्ष
संध्यातार्इंनी केला ‘चंदगड’सर
By admin | Updated: October 20, 2014 00:43 IST