शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसातही पोलिसांचा खडा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:16 IST

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी सकाळी मूक आंदोलनासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ परिसरात भर पावसातही पोलिसांचा खडा ...

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी सकाळी मूक आंदोलनासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ परिसरात भर पावसातही पोलिसांचा खडा बंदोबस्त राहिला. या आंदोलनाला होणारी गर्दी विचारात घेता, समाधीस्थळाकडे जाणारे सर्व वाहतुकीचे मार्ग पोलिसांनी रोखून धरले होते. मुसळधार पाऊस पडत असतानाही पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला. विशेष म्हणजे, आंदोलनस्थळ परिसरावर पोलिसांच्या दोन ड्रोनमार्फत विशेष नजर ठेवली जात होती.

मराठा समाज आरक्षण मागणीसाठी सकाळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलनाचे आयोजन केले होते. पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात केल्याने त्यातच कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. या आंदोलनाला होणारी गर्दी पाहता, आंदोलनस्थळाकडे येणारे सर्व रस्ते पोलिसांनी रोखून धरले होते. शहरात वाहनांची कोंडी होऊ नये म्हणून अवजड वाहतूक शहराबाहेरच रोखून ती परस्पर पर्यायी मार्गाने पुढे वळवली होती. याशिवाय शहरातील दसरा चौक, सीपीआर चौक, भाऊसिंगजी रोडवर जुनी मराठा बॅंक, सोन्या मारुती चौक, शिवाजी पूल याठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी अडवले होते. याशिवाय दसरा चौक, खानविलकर पेट्रोल पंपाशेजारील शंभर फुटी रोड, व्हीनस कॉर्नर परिसरातील गाडी अड्डा, चित्रदुर्ग मठ, महालक्ष्मी जीमखाना तसेच राजाराम रोडवर आंदोलकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था केली होती. त्यामुळे हा परिसर वाहनांच्या पार्किंगने फुल्ल झाला होता.

जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्यासह शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, अनिल गुजर, श्रीकृष्ण कटकधोंड, सीताराम डुबल हे अधिकारी आंदोलन स्थळावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लक्ष ठेवून होते. याशिवाय सुमारे दीड हजारांहून अधिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता.

शहरात नाकाबंदी, ड्रोनद्वारे नजर

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात १२ ठिकाणी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली. कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी पोलिसांच्या दोन ड्रोन कॅमेऱ्यांनी आंदोलनस्थळावर नजर ठेवली होती. त्याशिवाय परिसरातील उंच इमारतींवर टेहाळणी करण्यासाठी पोलीस तैनात केले होते.

फोटो नं. १६०६२०२१-कोल-आंदोलन पोलीस०१

ओळ : मराठा आरक्षण मागणीच्या मूक आंदोलनात राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळाकडे जाणारे सर्व मार्ग पोलिसांनी वाहतुकीसाठी रोखले होते. (छाया: आदित्य वेल्हाळ)

फोटो नं. १६०६२०२१-कोल-आंदोलन पोलीस०२

ओळ : पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, आदी पोलीस अधिकारी आंदोलनस्थळी विशेष लक्ष ठेवून होते. (छाया: आदित्य वेल्हाळ)

===Photopath===

160621\16kol_1_16062021_5.jpg~160621\16kol_2_16062021_5.jpg

===Caption===

ओळ : मराठा आरक्षण मागणीच्या मुक आंदोलनात राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळाकडे जाणारे सर्व मार्ग पोलिसांनी वाहतुकीसाठी रोखले होते. (छाया: आदीत्य वेल्हाळ)ओळ : पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे आदी पोलीस अधिकारी आंदोलनस्थळी विशेष लक्ष ठेवून होते. (छाया: आदीत्य वेल्हाळ)~ओळ : मराठा आरक्षण मागणीच्या मुक आंदोलनात राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळाकडे जाणारे सर्व मार्ग पोलिसांनी वाहतुकीसाठी रोखले होते. (छाया: आदीत्य वेल्हाळ)ओळ : पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे आदी पोलीस अधिकारी आंदोलनस्थळी विशेष लक्ष ठेवून होते. (छाया: आदीत्य वेल्हाळ)