शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रनगरीत आजही बेंदराचा उत्साह

By admin | Updated: June 20, 2016 00:56 IST

परंपरा जपली : जिम्नॅशियम मैदानावर धष्टपुष्ट बैलांच्या स्पर्धांना हजारो प्रेक्षकांची उपस्थिती

राजाराम पाटील ल्ल इचलकरंजी इचलकरंजी औद्योगिक नगरी असली तरी येथे अजूनही शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्याचबरोबर शहराच्या पूर्व-दक्षिण परिसरामध्ये अद्याप ग्रामीण संस्कृती जपली आहे. त्यामुळेच उद्या, मंगळवारी साजरा होणाऱ्या कर्नाटकी बेंदूर सणासाठीचा उत्साह शेतकरी वर्गामध्ये दिसू लागला आहे. बैल हे तरुण व बालवर्गाचे आकर्षण असल्याने युवक वर्ग बैलांची शिंगे रंगविण्यात आणि आकर्षक झुल, शिंगांचे गोंडे जमा करीत आहेत. अशा पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी येथील जिम्नॅशियम मैदानावर पार पडलेल्या आकर्षक व धष्टपुष्ट बैलांच्या स्पर्धांना हजारोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. इचलकरंजी सुदृढ बैल, वासरे आणि गायी यांच्या स्पर्धांना संस्थानकालीन इतिहास आहे. श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे-जहागीरदार यांनी शतकापूर्वी अशा स्पर्धा येथे सुरू केल्या. शेतीच्या मशागतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बैलांची निगा राखण्यात यावी आणि त्यांच्या पालनपोषणावर शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे, यासाठी सुदृढ बैल, वासरे, गायी, आदींच्या स्पर्धा जहागीरदार घेत होते. त्यामध्ये यशस्वी होणाऱ्या जनावराला बक्षिसेही दिली जात. त्याचवेळी जहागीरदार श्रीमंत ना. बा. घोरपडे यांनी बैलाने लाकूड ओढण्याच्या शर्यतीसुद्धा सुरू केल्या होत्या. साधारणत: ४० वर्षांपूर्वी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाने बैलाने लाकूड ओढण्याच्या शर्यती व सुदृढ जनावरांचे प्रदर्शन यासाठी चांगल्या भरीव निधीची तरतूद केली. अगदी स्पर्धेत यशस्वी बैलाला किंवा बैलजोडीला चांदीचे तोडे दिले जायचे. आज इचलकरंजीच्या गावभाग, जुना चंदूर रस्ता, आमराई, बी. पा. पाटील मळा, शहापूर, विक्रमनगर या परिसरांमध्ये शेतकरी कुटुंबे मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे कर्नाटकी बेंदराचा उत्साह अद्यापही वस्त्रनगरीत आहे. (प्रतिनिधी)