शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवजींनी थोबाडीत मारली तरी सत्तेतून बाहेर पडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : दोन्ही कॉंग्रेसनी प्रचंड महत्त्वाची खाती घेऊन आपला पारंपरिक कारभार सुरू ठेवला आहे. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : दोन्ही कॉंग्रेसनी प्रचंड महत्त्वाची खाती घेऊन आपला पारंपरिक कारभार सुरू ठेवला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी कोणाला थोबाडीत जरी मारली तरी कोणीही सत्तेतून बाहेर पडणार नाही, असे मित्र असलेला कॅबिनेट मंत्री माझ्याजवळ बोलला आहे, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कोणत्याही धमक्यांना आम्ही घाबरत नाही, असेही त्यांनी सांगितले.

कोल्हापुरात शनिवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर उत्तरे देताना महाविकास आघाडीला टीकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले, १२ बलुतेदार आणि नव्या १८ क्षेत्रांतील असंघटित कामगारांना दरमहा पाच हजार रुपये द्या, अशी भाजपची मागणी आहे. यासाठी ५० हजार कोटी लागणार आहेत. आम्ही पुण्यात रिक्षाचालक, शालेय बसेसचे चालक यांना दरमहा काही निधी देतो. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजप कार्यकर्त्यांना खोट्या केसीस टाकून हैराण केले जात आहे. जरा मनाविरुद्ध वागले की आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होताहेत. कोविड आचारसंहितेचा सोयीनुसार वापर सुरू आहे.

चौकट

भुजबळांची इमारत जप्त झाली त्याचे काय?

खालच्या कोर्टात दोषारोप सिद्ध झाले नाहीत म्हणून भुजबळ आणि राष्ट्रवादी ढोल बडवत आहे. याच वेळी त्यांची मुंबईतील १०० कोटींची बेनामी इमारत जप्त झाली त्याचे काय? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.

चौकट

कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा

मुंबई आणि पुण्यातील बलात्काराच्या घटना पाहता, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. कायद्याचा धाक राहिलेला नाही. बलात्कार करणाऱ्यांना लवकर अटक होत नाही. झाली तर दोन दिवसांत जामीन होतो. त्यामुळे धाडस वाढले आहे. मुख्यमंत्र्यांनी याचे मॉनिटरिंग केले पाहिजे असे पाटील यांनी सांगितले.

चौकट

मुश्रीफ यांची वृत्ती...

कोल्हापूरच्या शेजारील गावांची मानसिकता पाहून आम्ही प्राधिकरण तयार केले. नंतर आमचे सरकार गेले; परंतु तुमचे सरकार येऊन २२ महिने झाले. तुम्ही प्राधिकरणाला किती निधी दिला, असा उलट सवाल पाटील यांनी उपस्थित केला. आंबेओहोळसाठी फडणवीस यांच्याशी भांडून निधी लावून घेतला; परंतु मुश्रीफ यांची वृत्तीच ‘खोटं बोल खरं रेटून बोल’ अशी आहे, त्याला काय करणार? असा टोला पाटील यांनी लगावला.