शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मूल्यांकन समिती आज शहरात

By admin | Updated: July 24, 2014 00:18 IST

रस्ते विकास प्रकल्प : आयआरबीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करणार

कोल्हापूर : शहरातील रस्ते विकास प्रकल्पाचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेली तज्ज्ञांची समिती उद्या, गुरुवारी कोल्हापुरात येणार असून प्रत्यक्ष रस्त्यांच्या कामाची पाहणी करणार आहे. यापूर्वी एकदाच या समितीने कोल्हापुरात येऊन रस्ते विकास प्रकल्पाबाबत महानगरपालिका अधिकारी, सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समिती सदस्य तसेच आर्किटेक्टस् असोसिएशनचे सदस्य यांच्याकडून माहिती घेतली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशावरून रस्ते विकास महामंडळाने नियुक्त केलेली समितीच रस्त्यांचे मूल्यांकन करणार असली, तरी या समितीने रस्त्यांच्या सर्वेक्षणाचे काम मात्र त्यांच्या सहकाऱ्यांकडून करून घेतले आहे. जवळपास ४५ किलोमीटरपर्यंत हे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामही लवकरच पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. रस्ते विकास महामंडळाच्या अभियंत्यांनी १० जुलैपासून २१ जुलैपर्यंत ‘रोड लेव्हल व बिटल्स सर्व्हे’ (सर्वंकष सर्वेक्षण)द्वारे पूर्ण केला आहे. यामध्ये पदपथ, रस्त्याची उंची (प्लिंथ लेव्हल), डांबरी व सिमेंटच्या रस्त्यांची समानता, दोन्ही बाजूंची रुंदी, दर्जा, आदी तपासणी करण्यात आली. टोल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने प्रकल्पाची किंमत ठरवा ती भागविण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले असल्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशानुसार समितीने हे मूल्यांकनाचे काम सुरू केले आहे. या समितीचे प्रमुख के. व्ही. कृष्णराव हे असून, उदय खैराटकर व राजीव श्रीखंडे हे सदस्य आहेत. उद्या, गुरुवारी हे सदस्य प्रत्यक्ष कोल्हापूर शहरात ‘आयआरबी’ने केलेल्या रस्त्यांवर उतरून झालेल्या कामांची, अपूर्ण कामांची स्वत: पाहणी करणार आहेत. त्यानंतर अहवाल तयार करण्यासाठी डाटा तयार केला जाईल. डाटा तयार करणे, मूल्यांकनाचा अहवाल तयार करणे, या गोष्टीला आणखी किमान पंधरा दिवस लागतील.