शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

युतीच्या धोरणाने साखर कारखानदारी उद्ध्वस्त

By admin | Updated: January 29, 2015 00:07 IST

हसन मुश्रीफ : राज्यस्तरीय प्रतिनिधी संमेलनाच्या तयारीसाठी आयोजित कार्यकर्ता बैठक

कोल्हापूर : साखरेच्या दराबाबत ठोस धोरण नाही, साखर कारखान्यांना मदतीसाठी नुसते झुलवत ठेवायचे आणि दुसरीकडे एफआरपीप्रमाणे दर न देणाऱ्यांवर कारवाई करायचे धोरण, राज्यातील युती व केंद्रातील भाजप सरकारचे आहे. त्यामुळे संपूर्ण सहकारी साखर कारखानदारी उद्ध्वस्त होणार असल्याची टीका राज्याचे माजी जलसंपदामंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांनी आज, बुधवारी केली. पुणे येथे ७ व ८ फेबु्रवारीला होणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेस राज्यस्तरीय प्रतिनिधी संमेलनाच्या तयारीसाठी आयोजित केलेल्या कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. राज्य व केंद्रातील सरकार सर्व बाजूंनी निष्फळ ठरले आहे. त्याविरोधात जनआंदोलन उभे करण्याचे आवाहन करत आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, शेतकरी, कामगार यांच्या विरोधात काम सुरू केले आहे. याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून युती सरकारच्या कामकाजाचा पर्दाफाश करण्याची तयारी ठेवा. साखर कारखानदारीबाबत सरकारचे धोरण एकदम चुकीचे आहे. सहकार मोडीत निघाला, तर शेतकरी उद्ध्वस्त होईल, याचे भान सरकारला नाही. केवळ उद्योगपतींचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचा सपाटा केंद्र व राज्य सरकारने लावला असून, त्याला त्याच भाषेत उत्तर देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी महात्मा गांधी यांचे विचार व शांतीचा संदेश संपूर्ण जगाला आदर्श असल्याचे सांगितले, पण ज्यांनी गांधीजींचा खून केला त्या नथुराम गोडसेचे उदात्तीकरण भाजप सरकार करत आहे, अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून सरकारला घेरा, असे आवाहन आमदार मुश्रीफ यांनी केले. पुणे येथील मेळावा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, आगामी काळात केंद्र सरकारच्या सामान्य माणसांच्या विरोधातील धोरणांबाबत आपली भूमिका मांडावी लागणार असल्याचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी मनोगत व्यक्त केले. स्थायी सभापती आदिल फरास यांनी आभार मानले. महापौर तृप्ती माळवी, माजी आमदार नामदेवराव भोईटे, माजी महापौर कादंबरी कवाळे, गटनेता राजू लाटकर, मधुकर जांभळे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी प्रास्ताविकात पुणे येथील मेळावा, त्यासाठीच्या नियोजनाचा आढावा घेतला.