शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

‘यंग ब्रिगेड’चा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 01:13 IST

कोल्हापूर : देशाच्या विकासात बरोबरीचा सहभाग असलेल्या स्त्रीशक्तीने लोकसभा निवडणुकीत उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी सकाळपासून महिलांच्या लागलेल्या रांगा ...

कोल्हापूर : देशाच्या विकासात बरोबरीचा सहभाग असलेल्या स्त्रीशक्तीने लोकसभा निवडणुकीत उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी सकाळपासून महिलांच्या लागलेल्या रांगा आणि त्यांच्या उत्साहाने या लोकशाहीच्या उत्सवात महिलांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले; तर नवमतदार युवक-युवतींपासून ते अनेक निवडणुका पाहिलेल्या वयस्कर आजींपर्यंत सर्वांनी मंगळवारी मतदानाचा हक्क बजावत आपले कर्तव्य पार पडले.पूर्वी महिला मतदानात फारशा सहभागी होत नसत; पण गेल्या काही वर्षांत करण्यात आलेली जागृती आणि आपल्या मताला असलेले महत्त्व यांची जाणीव झाल्याने महिलांचा मतदानाचा टक्का वाढला आहे. सकाळी सात वाजल्यापासून सगळ्या मतदान केंद्रांवर गर्दी असली तरी घरातील सकाळची कामे आटोपल्यानंतर महिला मतदानासाठी बाहेर पडल्या. त्यामुळे सकाळी नऊ वाजल्यानंतर केंद्रांवर महिलांच्या रांगा दिसू लागल्या. भागा-भागांतील महिला एकत्रितरीत्या जवळच्या केंद्रावर जात होत्या. केंद्र लांब असेल तेथे रिक्षाने तसेच दुचाकी, चारचाकी गाड्यांतून महिला येत होत्या. शिवाजी पेठ, बी. टी. कॉलेज, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. प्रत्येक मतदान केंद्रावर महिलांच्या स्वतंत्र रांगा होत्या. अगदी सर्वसामान्य स्त्रीपासून ते उच्चभ्रू महिलांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्तपणे या लोकशाहीच्या उत्सवात आपला सहभाग नोंदविला.जे पहिल्यांदाच मतदानाचे कर्तव्य पार पाडणार होते, अशा नवमतदारांमध्ये विशेष उत्साह आणि औत्सुक्य होते. आपल्याही मताला आता महत्त्व आहे, याबद्दलचा आनंद निळी शाई आपल्या बोटावर लागल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. दुपारी एक वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर महिलांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर उन्हाचा तडाखा वाढल्याने दुपारी चार वाजेपर्यंत केंद्रांवर महिलांची गर्दी नव्हती. बी. टी. कॉलेज येथे महिलांची रांग पुरुषांपेक्षा जास्त होती.सेल्फी आणि सोशल अपडेटपहिल्या मतदानाचे समाधान युवक-युवतींच्या चेहºयावर दिसत होते. मतदान केंद्राबाहेर आल्यानंतरच बोटाला लागलेली शाई दाखवत अनेकांनी सेल्फी काढून फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपसारख्या सोशल मीडियावर शेअर केले.पाळणाघरापासून अनभिज्ञमतदारांना अधिक सोयी-सुविधा देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले असले तरी या सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचली नसल्याने त्यांचा फारसा उपयोग झाला नाही. मतदान केंद्रांवर बालकांसाठी पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली होती. ते माहीत नसल्याने महिला बालकांसह रांगेत उभ्या होत्या.व्हीव्हीपॅटचा प्रथमच वापरदोन्हीकडे काटाजोड लढती असल्यामुळे त्याचे प्रतिबिंब चांगले मतदान होण्यात पडले.इव्हीएम मशिनबद्दल विरोधी पक्षांनी देशभरातून तक्रारी झाल्यावर निवडणूक आयोगाने या मतदान प्रक्रियेवरील लोकांचा विश्वास वाढावा म्हणून या निवडणूकीत प्रथमच व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफाईड पेपर आॅडिट ट्रायल) यंत्राचा वापर करण्यात आला. मतदारांने ईव्हीएम मशीनवर आपल्या मतांचा हक्क बजावला की पुढच्या पाच सेकंदात आपण कुणाला मत दिले आहे ते व्हीव्हीपॅटवर दिसत होते.एवढे मतदान का झाले..?लोकांतील राजकीय जागरूकता, चांगल्या कामाला भरभरून प्रतिसाद देण्याची सामूहिक मानसिकता, मतदानाची व्यवस्था उत्तम, तणावविरहित वातावरण, मतदान वाढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेले प्रबोधन आणि सोशल मीडियावरील आवाहन याचा एकत्रित परिणाम म्हणून मतदानाचा टक्का वाढला.स्ट्राँगरूम परिसरात कडक बंदोबस्तकोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे ठेवण्यासाठी तयार केलेल्या स्ट्रॉँग रूम (सुरक्षा कक्ष) परिसरात मंगळवारी रात्रीपासून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथील स्ट्रॉँग रूम व हातकणंगले मतदारसंघाची मतदान यंत्रे ठेवण्यासाठी राजाराम तलाव येथील शासकीय गोदाम येथील स्ट्रॉँगरूम येथे सुरूहोती.