शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त खेळाडूंचा इचलकरंजीच्या नगराध्यक्षांना घेराव

By admin | Updated: April 29, 2015 01:03 IST

क्रीडांगणाची मागणी : दालनासमोर क्रिकेट खेळून केल्या भावना व्यक्त

इचलकरंजी : येथील जवाहरनगरमधील स्वामी अपार्टमेंट परिसरातील खुल्या जागेवर क्रीडांगण करावे, या मागणीसाठी खेळाडू व नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढला. नगराध्यक्षांना घेराव घालून आंदोलकांनी त्यांच्यासमोर संतप्त भावना व्यक्त केल्या. काही आंदोलकांनी तर नगराध्यक्षांच्या दालनासमोरील रिकाम्या जागेत क्रिकेट खेळून क्रीडांगणाच्या आवश्यकतेची तीव्रता दाखवून दिली.जवाहरनगर परिसरात गट क्रमांक ६६ येथे चार एकर जागा असून, या जागेचा वापर उपनगरातील मुले क्रीडांगण म्हणून करतात. मात्र, ही जागा चार वर्षांपूर्वी सेव्हंथ डे स्कूलला क्रीडांगणासाठी देण्यात आली. आता या शाळेकडून या जागेमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे बांधकाम करण्यास सरकारी स्तरावर मागणी केली होती, तर नगरपालिकेकडून पाण्याची नळजोडणी देण्यासाठी मागणी करण्यात आली. तसेच याठिकाणी विजेची जोडणीसुद्धा करून घेण्यात येणार असल्याचे समजले. सोमवारी (दि. २७) या जागेवर तात्पुरती शेडवजा इमारत उभारण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या या परिसरातील खेळाडू व नागरिकांनी तात्पुरते शेड पाडून टाकले.ही जागा क्रीडांगणासाठी आरक्षित असावी. किंबहुना, त्याठिकाणी क्रीडांगण विकसित करावे, या मागणीसाठी खेळाडू व नागरिकांनी नगरपालिकेवर मोर्चा काढला. त्यामध्ये मनोज हिंगमिरे, संतोष कुपटे, द्वारकाधीश खंडेलवाल, पिंटू शिकलगार, रियाज जमादार, भाऊ खवरे, आदींचा समावेश होता. मोर्चातील शिष्टमंडळाने नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांना निवेदन दिले. त्यावेळी झालेल्या चर्चेत नगरपालिका प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरूपाचे बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आल्याचे उघड झाले. त्यामुळे आणखीन संतप्त झालेल्या खेळाडू व नागरिकांनी नगराध्यक्षा बिरंजे, कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील व अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले. यावेळी काही काळ गोंधळ उडाला होता. अखेर सर्वांना शांत करून नगराध्यक्षांनी ही जागा क्रीडांगणासाठी आरक्षित करण्यात येईल. तसा विषय नजीकच्या सर्वसाधारण सभेत ठेवून मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन संपुष्टात आले. (प्रतिनिधी)