शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

-महाविद्यालयांत प्रबोधन : व्यसनाधिनता घटली , शाळा

By admin | Updated: July 29, 2014 23:07 IST

५७ लाखांचा गुटखा, सुगंधी तंबाखू जप्त

एकनाथ पाटील -कोल्हापूर--  कर्नाटक सीमेवरून कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांत सुगंधी तंबाखू व गुटख्याची चोरून होणाऱ्या आयातीवर पोलीस व अन्न आणि औषध प्रशासनाने चांगलाच लगाम घातला आहे. तरुणाई व्यसनांपासून अलिप्त राहावी, यासाठी राज्य शासनाने घेतलेल्या गुटखाबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी दोन्ही विभागाकडून केली जात आहे. वर्षभरात गुटखा व सुगंधी तंबाखू तस्करांवर ४२ गुन्हे दाखल करून, ५७ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करून तो नाश करण्यात आला आहे. उद्या मंगळवार अमली पदार्थविरोधी दिन साजरा केला जात आहे. त्यानिमित्त घेतलेला आढावा.कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश तरुणवर्ग गुटखा व सुगंधी तंबाखूच्या अधीन गेल्याचे विदारक चित्र होते. अनेकजण अतिव्यसनाधिन होऊन मृत्यूमुखीही पडले. शासनाने यावर बंदी घातल्याने विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये गुटखा खाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. अन्न व औषध विभागाच्या पथकाने वर्षभरात ४२ ठिकाणी छापे टाकून सुमारे ५७ लाखांचा माल जप्त केला, तर १४ जणांवर दंडात्मक कारवाई केली.दंडात्मक कारवाईतून सरकारला १३ लाख ३७ हजार रुपये मिळाले. गुटखाबंदी आणखी तीव्र होण्यासाठी हा विभाग सातत्याने प्रयत्न करीत आहे. जकात नाका, चेक पोस्टची तपासणी करून वाहनांची तपासणी करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात व्यापारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांधीनगरमध्ये सुगंधी तंबाखू व गुटख्याची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते. अन्न व औषध प्रशासनाने येथील गोदामासह शहरातील पानटपरी, किराणा मालाचे दुकान, वाहनांतून येणारा गुटखा यावर कारवाई करून तस्करबहाद्दरांना चांगलाच चाप लावला आहे. शाळा, महाविद्यालयीन परिसरात आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने विविध प्रबोधनात्मक पोस्टर्स लावली गेली आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी तरुणांत या गुटखा व तंबाखूची चांगलीच भीती निर्माण झाली आहे. कारवाई सुरूच राहणारगुटखाबंदी अंमलबजावणी होण्यासाठी प्रशासन तत्पर आहे. शाळा, कॉलेज परिसरात चोरून गुटखा विकणाऱ्यांवरही पोलिसांचे पथक लक्ष ठेवून आहे. सुगंधी तंबाखू व गुटख्यावरील कारवाई ही सुरूच राहील. डॉ. मनोजकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक कडक अंमलबजावणीगुटखा व सुगंधी तंबाखू यांच्या बंदीबाबत कडक अंमलबजावणी केली जात आहे. चोरून कोणी विकत असेल, तर त्याची माहिती नागरिकांनी आम्हाला द्यावी, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. - संपतराव देशमुख, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, कोल्हापूरप्रबोधनावर भर गुटखाबंदीसाठी सर्व स्तरावर प्रबोधन केले जात आहे. सुगंधी तंबाखू व गुटखा सेवन केल्यानंतर त्याचे आरोग्यावर काय दृष्य परिणाम होतात, त्याचे पोस्टर्स बसस्टॉप, शाळा-महाविद्यालय, शासकीय कार्यालये, पानटपरी, ग्रामपंचायत, आदी ठिकाणी लावली जात आहेत.- बी. आर. आरसुळकर, जिल्हा शल्य चिकित्सक, सीपीआर