शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्यांनी समाजाभिमुख संशोधन करणे गरजेचे

By admin | Updated: March 8, 2016 00:49 IST

विश्वास कदम : भारती अभियांत्रिकीमध्ये राष्ट्रीय परिषद

कोल्हापूर : जागतिक स्पर्धेत टिकायचे असेल तर तंत्रज्ञानाबरोबर इतर कौशल्येही विद्यार्थ्यांनी जोपासली पाहिजेत. अभियंत्यांनी समाजाभिमुख संशोधन करण्याची गरज आहे. त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञानातील बदल आत्मसात करावेत, असे आवाहन ब्रुनेई शेल पेट्रोलियम कंपनीतील कम्प्लायन्स व गव्हर्नन्स विभागाचे माजी प्रमुख प्रा. विश्वास कदम यांनी केले. भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजित सहाव्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. एस. एच. सावंत उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संगीता चौगुले होत्या.यावेळी सावंत म्हणाले, अभियांत्रिकीच्या सर्वच शाखांतील विद्यार्थ्यांना भविष्यात आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. बदलत्या काळात लोकांच्या अपेक्षा वाढत आहेत. अशावेळी अभियंत्यांनी नवनिर्मितीचा ध्यास बाळगून प्रयत्नशील राहावे.बदलत्या तंत्रज्ञानाची ओळख व माहिती विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापकांना व्हावी, या उद्देशाने या परिषदेचे आयोजन केले होते. विविध विद्यापीठांमधील अभियांत्रिकीच्या २३५ हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थी, संशोधकांनी सादर केलेल्या शोधनिबंधाच्या पुस्तिकेचे प्रकाशनही झाले. परिषदेला व्यवस्थापक व मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. एस. जे. कदम, मुख्य समन्वयक प्रा. ए. पी. कदम, प्रशासकीय अधिकारी राहुल कदम, सर्व विभागप्रमुख, आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक व्यवस्थापक प्रा. एस. के. कदम यांनी केले. प्रा. एस. टी. घुटुकडे यांनी आभार केले. ( प्रतिनिधी )